घरक्राइममहाराष्ट्रात कायदा फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यापुरता

महाराष्ट्रात कायदा फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यापुरता

Subscribe

आमदार देवयानी फरांदे ; २४ शिवसैनिकांना अटक करण्याची मागणी

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यापुरता कायदा राहिलेला आहे. पोलिसांचे शिवसैनिकांना संरक्षण दिले जात आहे. २४ तास उलटून गेले तरी शिवसैनिक सापडलेले नाही. ते मुंबईत आहेत. शिवसेना सत्तेचा वापर करत त्यांना वचवत आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे गुन्हेगारीला प्रवृत्तीला मुख्यमंत्री बळ देत आहेत. दैनिक सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला असून, तो शहरातील चौकात होर्डिंगवर लावण्यात आला आहे. त्यानून शहरात अशांतता निर्माण होईल असा मजकूर आहे. याप्रकरणी भाजपतर्फे सामानाच्या संपादकांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत, अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी (दि.24) शिवसेना व भाजपमध्ये झालेला राडा अद्यापपावेतो मिटलेला नाही. नाशिक पोलिसांनी दगडफेक करणार्‍या शिवसैनिकांना अटक केली नसल्याने आणि शिवसेनेने राणेंविरोधातील दैनिक सामनामधील अग्रलेख होर्डिंगवर झळकावल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आले. आयुक्तांच्या भेटीनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, राणेंच्या वक्तव्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करत लगेच त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले. मंगळवारी सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. शिपायाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण असून सामनाच्या संपादकावर कारवाई करा, अशी मागणी नाशिक भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे,आमदार राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रशांत जाधव, रोहिणी नायडू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात तक्रार देणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर निवडणूक काळात उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल चपलेने मारायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार आहे. राज्यात पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात आहे. जनतेमध्ये व भाजप कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक पोलीस दबावाखाली निर्माण काम करत आहेत का, असा प्रश्न पडला आहे, आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -