घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ११ महिन्यांत १६३ जणांचा बळी

नाशिकमध्ये ११ महिन्यांत १६३ जणांचा बळी

Subscribe

अपघात वाढले; मृतांमध्ये १७ महिला, १४६ पुरुषांचा समावेश

नाशिक:शहरात ११ महिन्यात तब्बल ४२९ अपघात झाले असून, १५५ जीवघेण्या अपघातांमध्ये १६३ जणांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात अपघात कमी होते. तर निर्बंध शिथील होताच अपघातांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

नाशिक शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय अनोख्या पद्धतीने हेल्मेट मोहीम राबवत आहेत. मात्र, वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे अपघात आकडेवारीवरुन दिसत आहेत. सर्वाधिक ३०५ अपघात वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने झाले आहेत. त्यानंतर ७५ अपघात विनाहेल्मेटमुळे झाले असून, ३४ दुचाकीचालकांचा बळी गेला आहे.

- Advertisement -

अशी आहे अपघात आकडेवारी

  • अपघात:४२९
  • जीवघेणे अपघात:१५५
  •  राष्ट्रीय महामार्ग:१४२
  •  शहर उपरस्ते:२७५ 

 

- Advertisement -

 

 

 

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -