घरमहाराष्ट्रनाशिकबाजारसमिती आवारात सीसीटीव्ही बसविणार

बाजारसमिती आवारात सीसीटीव्ही बसविणार

Subscribe

आमदार बनकर : पिंपळगाव कृऊबाची १७ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

पिंपळगाव बसवंत : शेतकरी, कामगारांच्या हितासाठी काम करणार्‍या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीने गेल्या २२ वर्षांपासून शहराच्या वैभवात भर घालण्याचं काम केलं. बाजारसमितीच्या पुढाकारात आत्तापर्यंत जे काही काम केलं ते व्यक्तिगत हितासाठी नाही तर शेतकरी हितासाठीच केलं. बाजारसमितीत शेतकर्‍यांशी मनमानी करणार्‍या आत्तापर्यंत आठ आडतदार व्यापार्‍यांचे परवाने रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बाजारसमितीने घेतला आहे.

शेतकर्‍यांशी मनमानी करणार्‍या आडातदार व्यापार्‍यांना चाप बसवा व पारदर्शी व्यवहरासाठी पिंपळगाव बाजारसमितीच्या संपूर्ण आवारात येत्या काही दिवसांत सीसीटीव्ही कार्यान्वित करणार असल्याची माहिती निफाडचे आमदार, तथा पिंपळगाव बसवंत बाजारसमितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दिली.

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजारसमितीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाजारसमितीच्या सभागृहात सभापती आ. दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाजारसमितीचे उपसभापती दीपक बोरस्ते, जि. प. सदस्य सिद्धार्थ, वणारसे, जि. प. सदस्य सुरेश कमानकर, संचालक सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, रामभाऊ माळोदे, नंदू सांगळे, संजय मोरे, निवृत्ती धनवटे, शंकरलाल ठक्कर, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुनीता राजोळे, अतुल शहा, दीपक बनकर, विजय बाफना, बाबासाहेब शिंदे, माधव ढोमसे, शरद काळे, संपत विधाते,सोपान खालकर, नारायण पोटे, सचिव बाळासाहेब बाजारे, आदींसह शेतकरी व्यापारी, कामगार घटक उपस्थित होते. पतसंस्थेने रानवड कारखाना सुरू केला आहे. आता बाजारसमितीच्या माध्यमातून निफाड साखर कारखाना सुरू होण्याची अपेक्षा नंदू सांगळे व्यक्त केली.आभार नारायण पोटे यांनी मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -