घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपचा वरचष्मा; सेनेची पिछेहाट

नाशिक तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपचा वरचष्मा; सेनेची पिछेहाट

Subscribe

नाशिक : राज्यात सत्तांतरानंतर प्रथमच थेट जनतेतुन निवडून आलेल्या सरपंचपदाच्या निवडणूकीत नाशिक तालुक्यात भाजपा आणि राष्ट्रवादीला कौल मिळाला आहे. यात या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेना व कॉग्रेसच्या समसमान तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. शिवसेनेचे व कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.

नाशिक तहसिल कार्यालयात सोमवारी (दि.१९) झालेल्या मतमोजणीत दुपारी १२ पर्यंत सर्वच्यासर्व १६ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणूकीत दहेगाव येथील शीतल बेंडकुळी या पहिलेच बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठीच्या जागेसाठीची प्रथमत: मोजणी करण्यात आली.अंतिम मतमाजेणीनंतर हाती आलेल्या निकालात ओझरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबुराव सीताराम दिवे (८४९ मते) यांचा दणदणीत विजय झाला आहे. सारूळ ग्रामपंचायतीच्या सरळसरळ झालेल्या दुरंगी लढतीत सरपंचपदी मोहन लक्ष्मण डगले (४४२ मते) यांनी विजय मिळविला आहे. तर वासाळी ग्रामपंचायतीच्या दुरंगी लढतीत आशा उत्तम खेटरे (३८८ मते) या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. राजूरबहुला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा गुलाब ससाणे (५०८ मते) यांचा दणदणीत विजय झाला आहे.

- Advertisement -

गणेशगाव त्रंबक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली लक्ष्मण ठमके (४४९ मते) यांचा विजय झाला आहे. नागलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपचंद गोपाळा पोटींडे (२५७ मते) निवडून आले आहेत. गंगावर्‍हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या पंचरंगी लढतीत लक्षमण जगन्नाथ बेंडकुळे (४५२ मते) यांनी जयराम सीताराम गोतरणे (४३९ मते) यांचा अवघ्या १३ मतांनी पराभव केला आहे. दुगाव ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी ज्ञानेश्वर अर्जुन गवे (४४७ मते) यांनी विजय मिळवला. सरपंचपदासाठी ९ उमेदवार रिंगणात होते. नाईकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारताबाई बदादे (५७० मते) यांनी जिजा निपळूंगे (१९८ मते) यांचा पराभव केला. जातेग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरला बाळू निंबेकर (८८४ मते) यानी दणदणीत विजय मिळवला. इंदिरानगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चांगुणा बेंडकुळी (४८८ मते) विजयी झाल्या आहेत. वाडगाव सरपंचपदी वनिता निंबेकर (५५२ मते) यांनी विजयी गुलाल उधळला आहे. तर गोवर्धन सरपंचपदी गोविंद डंबाळे (१३७१ मते) यांनी बापू डंबाळे (८७७ मते) यांचा ४९४ मतांनी दणदणीत पराभव करत विजयश्री खेचून आणला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -