Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नर्सच्या पतीने उपचार केल्या प्रकरणी रुग्णावर नर्सनेच उपचार केल्याचा तपास पथकाचा अजब...

नर्सच्या पतीने उपचार केल्या प्रकरणी रुग्णावर नर्सनेच उपचार केल्याचा तपास पथकाचा अजब दावा

Subscribe

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर बाहेरगावी आणि नर्स गैरहजर असताना बनियनवर हजर असलेल्या नर्सच्या पतीनेच जखमींवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. माय महानगर’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी संबंधित आरोग्य केंद्राला भेट दिली. मात्र, असा काही प्रकारच घडला नसल्याचे सांगत त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका अपघातात जखमी झालेले प्रकाश पादीर, योगेश पुजारा, कुडलीक पादिर यांना उपचारासाठी वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता एकही कर्मचारी हजर नसल्याचे समोर आले होते. डॉ. लचके बाहेरगावी गेले असल्याचे तर नर्स अनुपस्थित असल्याचे समोर आले. रुग्णांनी विचारणा केली तेव्हा केंद्रात बनियनवर असलेला नर्सचा पती उपस्थित होता. त्यानेच जखमींवर उपचार सुरू केले. मलमपट्टी झाल्यानंतर नर्स आरोग्य केंद्रात आली.

- Advertisement -

याबाबतचे वृत्त दैनिक आपलं महानगरमध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना तातडीने या आरोग्य केंद्राला भेट देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वैद्यकीय अधिकार्‍यांनी भेट दिली मात्र असा काही प्रकारच घडला नसल्याचे सांगत एकप्रकारे त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि नर्सला क्लीनचीटच दिल्याचे दिसून आले. त्यामुळे आता आरोग्याधिकार्‍यांनी त्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

या प्रश्नांची उत्तरे कधी देणार?

तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार “आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने त्यांचे वेतन कापले जाणार असले तरी जखमींवर नर्सनेच उपचार केले. केंद्रावरील डयुटीवर असलेली नर्स ही बाजूच्या गावात राहते. रात्रीची वेळ असल्याने ती आपल्या पतीसोबत केंद्रात आली व त्यानंतर तिने उपचार केले.” मात्र, प्रश्न हा आहे की नर्स पतीसोबत आरोग्य केंद्रात आली होती तर, त्यावेळी ज्यांची डयुटी होती त्या नर्स कुठे होत्या. आपात्कालीन परिस्थिती म्हणून ही नर्स आपल्या पतीसोबत केंद्रात आली होती तर त्यांचा पती जखमींवर उपचार कसा करत होता, याप्रश्नांची उत्तरे मात्र अधिकारी देऊ शकलेले नाहीत. ही उत्तरे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात येणार्‍या अहवालातून समोर येतील, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -