घर उत्तर महाराष्ट्र नाशिक शहरातील खुनाच्या घटनांमध्ये टीप देणारीही यंत्रणा सक्रिय ?

नाशिक शहरातील खुनाच्या घटनांमध्ये टीप देणारीही यंत्रणा सक्रिय ?

Subscribe

Nashik crime नाशिक : नाशिक शहरात मागील काही महिन्यात सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा दिसून येतो तो म्हणजे खुनाच्या (murder case) घटनेतील आरोपींना मृत नेमका कुठल्या वेळी कुठे आहे याची बित्तम माहिती असल्याचे तपासात समोर आले आहे. जुने सिडको परिसरात झालेल्या संदीप आठवले खून प्रकरणात ही बाब अधिक प्रकर्षाने समोर आली आहे. या गुन्हेगारांना टीप देणारी यंत्रणा कार्यरत आहे का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

गुरुवारी (दि. २४) ओम पवार याने आपल्या अन्य पाच साथीदारांच्या मदतीने संदीप आठवले या तरुणाचा जुने सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौकात भरदिवसा खून केला. या आधी त्याने संदीपवर कॉलेज रोड परिसरातील एका कॅफे मध्ये मैत्रिणी सोबत कॉफी पिण्याचा आनंद घेत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तसेच संदीपने देखील दीड महिन्यापूर्वी मृत संदीप आठवले याने पाथर्डी फाटा परिसरात ओम पवार मद्यप्राशन करत असताना त्याच्यावर हल्ला करत त्याला मारहाण केली तसेच त्याचा व्हिडिओ बनवला होता. या तिन्ही प्रसंगी आरोपी ओम पवार आणि मृत संदीप आठवले यांना समोरचा व्यक्ति कुठे आहे याची बित्तम टीप मिळालेली होती असे तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

यानिमित्ताने असा प्रश्न निर्माण होतो की या गुन्हेगारांना टीप देणारी देखील यंत्रणा कार्यरत आहे का? जर याच्याकडे अशी यंत्रणा असेल तर टीप देणाऱ्यांचा शोध घेऊन ती यंत्रानाही उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. तसेच खुनात मदत केल्या प्रकरणी त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी पुढे येत आहे.

खुनाच्या घटनेच्या दिवशी संशयित आरोपी ओम पवार आणि मृत संदीप आठवले या दोघांचेही फोनवर बोलणे झाले होते. मात्र, दीड महिन्यापूर्वी जेव्हा संदीपने ओम पवारला मारहाण करत व्हिडिओ काढला होता तेव्हा ओम कुठे आहे याची टीप संदिपला मिळाली होती हे तपासात समोर आले आहे. : शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, परीमंडल 3

खुनानंतरही इंस्टा’वॉर’ सुरूच ?

संदीप आठवले याचा खून झाल्यानंतरही दोन्ही बाजूच्या काही त्यांच्या समर्थकांनी चिथावणीखोर स्टेट्स ठेवल्याची माहिती समोर येत आहे. आठवले याच्या बाजूने ओमच्या मारहाणीच्या व्हिडिओचा का भाग टाकून त्यावर ‘रीप्लाय मिळणारच’ तर ओम पवारच्या बाजूने ‘तुम्ही फक्त व्हिडिओ टाकला आम्ही तुमच्या भाईची डायरेक्ट बातमीच करून टाकली’ अश्या स्वरूपाचे स्टेट्स ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. जर, या सोशल मीडिया टवाळखोरांना रोखायचे असेल तर पोलीस प्रशासनाला अधिक मेहनत घ्यावी लागेल हे मात्र नक्की!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -