घरताज्या घडामोडीकांदा व्यापाऱ्यांवर Income Tax विभागाचे छापे, पिंपळगाव बसवंतमध्ये खळबळ

कांदा व्यापाऱ्यांवर Income Tax विभागाचे छापे, पिंपळगाव बसवंतमध्ये खळबळ

Subscribe

शहरातील चार प्रतिष्ठीत कांदा व्यापाऱ्यांची चौकशी

ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये आज आयकर विभागाने छापा टाकत शहरातील चार प्रतिष्ठीत कांदा व्यापाऱ्यांची चौकशी केली. या कारवाईमुळे शहरात मात्र एकच खळबळ उडालीय.

आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास या धाडी टाकल्या. पिंपळगाव बसवंतमधल्या चार बड्या व्यापाऱ्यांची घरं, गोडावून, कार्यालयं आणि आडत अशा १३ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. इन्कम टॅक्स विभागाच्या सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी ही कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याने प्रतिक्विंटल ४ हजारांचा टप्पा पार केला होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने त्याचा थेट दरांवर परिणाम होतो की काय, अशी भितीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान, आयकर विभागाच्या पथकांनी कांदा विक्रीची बिले, खरेदीच्या पावत्या, कर भरणा यासंदर्भात पडताळणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली होती. यापूर्वीही आयकर विभागाने नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर छापेसत्र केले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -