घरताज्या घडामोडीउत्पन्न वाढवा दोन लाख बक्षीस मिळवा-परिवहनमंत्री अ‍ॅड.अनिल परब यांची घोषणा

उत्पन्न वाढवा दोन लाख बक्षीस मिळवा-परिवहनमंत्री अ‍ॅड.अनिल परब यांची घोषणा

Subscribe

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, प्रवाशांना कार्यक्षम व तत्पर प्रवासा सेवा उपलब्ध होण्यासाठी परिवहन महामंडळाच्या स्तरावरून सर्वंकष कार्यवाही करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या उत्पन्न वाढवा विशेष अभियानांतर्गत गतवर्षाच्या तुलनेत एका महिन्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवणार्‍या आगारांना दरमहा रुपये दोन लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अँड. अनिल परब यांनी केली आहे . या अभियानाअंतर्गत जे आगार निकृष्ट कामगिरी करतील त्या आगारातील जबाबदार अधिकार्‍यांना शिक्षेचे प्रयोजन देखील ठेवण्यात आले आहे.

एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढावे, यासाठी विविध स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी बैठकीमध्ये दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देत असताना अ‍ॅड. परब यांनी स्पर्धेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्याची प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार एसटीच्या 250 आगारांची (डेपो)प्रदेशनिहाय विभागणी करून प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणार्‍या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा दोन लाख रुपये, द्वितीय आगारास दीड लाख रुपये व तृतीय आगारास एक लाख रुपये असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

- Advertisement -

महामंडळाच्या 31 विभागापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विभागांना देखील आगाराप्रमाणे प्रथम क्रमांक दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकास दीड लाख रुपये व तृतीय क्रमांकास एक लाख 25 हजार रुपये असे रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. हे अभियान प्रयोगिक तत्वावर 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. या स्पर्धात्मक अभियानांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या आगारांना बक्षीस देण्यात येणार आहे तसेच निकृष्ट कामगिरी करणार्‍या आगारातील संबंधित जबाबदार अधिकार्‍यांना शिक्षा देखील करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार निकृष्ट कामगिरी करणार्‍या आगारातील अधिकार्‍यांचे गोपनीय अहवाल राखून ठेवणे त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे अथवा कारवाई करणे, असे या शिक्षेचे स्वरूप असणार आहे. त्यामुळे केवळ बक्षिसासाठीच नव्हे तर शिक्षेपासून बचावण्यासाठी देखील सर्व 250 आगारांनी आपली कार्यक्षमता वाढवावी लागणार आहे .

३१ विभागांच्या २५० आगारांमध्ये स्पर्धा
उत्पन्न वाढवा विशेष अभियान एक मार्च ते 30 एप्रिल 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राज्यातील परिवहन महामंडळाच्या ३१ विभागांमध्ये राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत २५० आगारांमध्ये स्पर्धा घेतली जाणार आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विभागांना बक्षिसे तर निकृष्ट काम करणार्‍या आगारांच्या जबाबदार अधिकार्‍यास शिक्षा केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -