घरमहाराष्ट्रनाशिकवाढीव बांधकाम, पुनर्बांधणीची माहिती न कळवल्यास एकतर्फी कर आकारणी

वाढीव बांधकाम, पुनर्बांधणीची माहिती न कळवल्यास एकतर्फी कर आकारणी

Subscribe

महापालिका प्रशासनाचा मिळकतधारकांना इशारा

नाशिक : शहरातील मिळकतदार, भोगवटदारांसाठी महापालिका प्रशासनाने महत्वपूर्ण सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ज्या मिळकतदार किंवा भोगवटदारांनी आपल्या मिळकतीमध्ये वाढीव बांधकाम केले आहे, मिळकतीची पुनर्बांधणी केली आहे, मिळकतीच्या वापरामध्ये बदल केला आहे, मालमत्ता नव्याने विकसित केली आहे, मालमत्ता भाडेतत्त्वावर वापरण्याकरिता दिली आहे, अशा मिळकत मालकांनी या संदर्भातील माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. ३० दिवसांच्या आत या संदर्भातील अर्ज प्रशासनाला सादर न केल्यास संबंधितांवर एकतर्फी कर आकारणी केली जाईल असा इशारा कर संकलन विभागाकडून देण्यात आला आहे.

मालमत्तेचे कर निर्धारण हे सदर मिळकतीचे चटई क्षेत्र, वापराचा प्रकार, बांधकामाचा प्रकार (निवासी वा अनिवासी) यावर आधारभूत आहे. यानुसार मालमत्तेचे कलम 129 नुसार करयोग्य मुल्य निर्धारीत करुन, कर निर्धारण करण्यात येते. त्यानुसार मिळकतधारक वा भोगवटादारांना मालमत्ता कराचे बिले देण्यात येतात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार मिळकतीचे बांधकाम झाल्यास, मिळकतीची पुनर्बांधणी झाल्यास, अथवा मिळकतीचा वापर सुरु झाल्यानंतर मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी मिळकतधारक किंवा भोगवटादारांनी महानगरपालिकेस कागदपत्रासह कळविणे बंधनकारक असतेे. तथापी असे असतांना जे मिळकतधारक किंवा भोगवटादार त्यांच्या मिळकतीची माहिती महानगरपालिकेस सादर करीत नाही, अशा मिळकतधारकांकडुन मालमत्ता कर आकारणीसाठी कागदपत्रे वा माहिती मागविण्याबाबत तरतूद आहे. यानुसार नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मिळकतधारकांंना प्रशासनाने सूचित केले आहे की, ज्या मिळकतधारकांनी त्यांच्या मिळकतीमध्ये वाढीव बांधकाम केले आहे, मिळकतीची पुनर्बांधणी केली आहे, मिळकतीच्या वापरामध्ये बदल केला आहे, मालमत्ता नव्याने विकसित केली आहे, मालमत्ता भाडेतत्त्वावर वापरण्याकरिता दिली आहे, परंतु अशा मालमत्तेच्या मालमत्ता कर आकारणीमध्ये सुधारणा, बदल करणेकरिता महानगरपालिकेस
कळविण्यात आले नाही.

- Advertisement -

परिणामी संबंधित मालमत्तेच्या कर आकारणीमध्ये सुधारणा, बदल झालेला नाही, अशा मालमत्ता मिळकतधारकांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती 30 दिवसांच्या आत, संबंधित विभागीय कार्यालयात अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना नाशिक महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -