घरमहाराष्ट्रनाशिकवाढत्या कोरोना संसर्गाचा ठपका; नाशिक सिव्हिल सर्जन सक्तीच्या रजेवर

वाढत्या कोरोना संसर्गाचा ठपका; नाशिक सिव्हिल सर्जन सक्तीच्या रजेवर

Subscribe

कोरोनाचा असाही फटका : जून व जुलै महिन्यात वैद्यकीय कारणास्तव घेतलेल्या रजाही भोवल्या

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. डॉ. जगदाळे यांनी जून आणि जुलै महिन्यात वैद्यकीय कारणास्तव रजा घेतल्याने अनेक कामे प्रलंबित राहल्याचे कारण दाखवण्यात आले आहे.

नाशिकसह मालेगावी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांना त्या ठिकाणी पाठवले होते. त्यावेळी परिचारिकांना मूलभूत सुविधा मिळाला नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मध्यरात्री आंदोलन केले होते. त्यानंतर जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने परिचारिकांची पर्यायी व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी डॉ. जगदाळे यांना सूचना देत होते. तरीही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण आले नाही. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी डॉ. जगदाळे यांना लेखी नोटीस बजावली होती. डॉ. जगदाळे यांच्या असमाधानी कामगिरीबाबत जिल्हाधिकारी नाराज होते. राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्याचा ठपका जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. डॉ. जगदाळे यांनी जून व जुलै महिन्यात वैद्यकीय कारणास्तव रजा घेतल्या होत्या.

- Advertisement -

दरम्यान, त्यांचे कामकाज अतिरिक्त शल्यचिकित्सक पाहत होते. अतिरिक्त कामकाजामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांची कामे प्रलंबित राहू लागली. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य शासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -