घरमहाराष्ट्रनाशिकसोमवारपासून नाशिकरोडला वाढीव पाणीपुरवठा

सोमवारपासून नाशिकरोडला वाढीव पाणीपुरवठा

Subscribe

महापौर सतीश कुलकर्णी यांचा निर्णय

नाशिकरोडला कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे गेल्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी रौद्रावतार धारण केला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी दुसर्‍याच दिवशी प्रशासन आणि नगरसेवकांबरोबर बैठक घेत येत्या सोमवार (दि. २५) पासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच या परिसरात वाढीव पाणी देण्याचेही त्यांनी आदेशित केले.

या बैठकीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, नाशिकरोड परिसरातील पाण्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन त्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे. सोमवारपासून चार एमएलडी वाढीव पाणी पुरवठा करावा. तसेच या परिसरातील व्हॉलमन यांची माहिती सर्व नगरसेवकांना देऊन स्वच्छ पाणीपुरवठा होईल याबाबत पाणी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृहनेते सतीश सोनवणे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, प्रा. शरद मोरे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, पंडित आवारे, सुनील गोडसे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, उपअभियंता राजेंद्र पालवे, जाधव, दप्तरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -