घरमहाराष्ट्रनाशिकपॉर्न साईटवर नग्न व्हिडिओ टाकून ब्लॅकमेलिंग; जर्मनीतील भारतीय मुले भामट्यांच्या जाळ्यात

पॉर्न साईटवर नग्न व्हिडिओ टाकून ब्लॅकमेलिंग; जर्मनीतील भारतीय मुले भामट्यांच्या जाळ्यात

Subscribe

भारतातून शिक्षणासाठी येणार्‍या तरुणांना हेरून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आणि काही काळातच व्हिडिओ कॉलद्वारेे त्यांचे नग्नावस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे मोठे स्कँडल जर्मनीत कार्यरत असल्याचे पुढे आले आहे. नाशिकमधून शिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी जर्मनीत गेलेला एक तरुण या परदेशी सायबर भामट्यांच्या जाळ्यात फसला आहे.

भारतातून शिक्षणासाठी येणार्‍या तरुणांना हेरून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आणि काही काळातच व्हिडिओ कॉलद्वारेे त्यांचे नग्नावस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे मोठे स्कँडल जर्मनीत कार्यरत असल्याचे पुढे आले आहे. नाशिकमधून शिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी जर्मनीत गेलेला एक तरुण या परदेशी सायबर भामट्यांच्या जाळ्यात फसला आहे. त्याचा नग्नावस्थेतील व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकून आता दररोज फोन करून पैशांची मागणी केली जात आहे. नाशिकमधीलच दुसरा एक तरुण या फसवणुकीपासून थोडक्यात बचावला आहे. या स्कँडलचे जाळे मोठे असेल, अशी शक्यता सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण सध्या कमालीचे वाढले आहे. त्यात विशेषत: अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांत पदव्युत्तर शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. नाशिकमधील एक तरुण तीन महिन्यापूर्वीच जर्मनीला एम. ई. करण्यासाठी रवाना झाला. तेथील संस्कृतीशी जुळवून घेत असतानाच तो परदेशी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकला. फेसबुकवर एका जर्मनीतील तरुणीने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती स्वीकारल्यावर त्यांचे चॅटींग सुरू झाले. काही काळात दोघांनी परस्परांना आपापले मोबाइल क्रमांक शेअर केले. थोड्याच दिवसांत तरुणी आणि त्याच्यात अश्लील संभाषण सुरू झाले. हे प्रकरण चॅटींगवरुन व्हिडिओ कॉलींगपर्यंत गेले. दोघांच्याही घरात कुणी नसल्यामुळे ते मोकळेपणाने व्हिडिओ कॉल करू लागले. त्यात तरुणीने स्वत:चे कपडे काढून तरुणालाही त्याचे कपडे काढण्याचा गळ घातला. या आग्रहाला फसत त्याने नग्नावस्थेत तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलणे सुरू केले. मात्र, हे बोलणे रेकॉर्ड करण्यात आले. काही दिवसात तरुणाला एका परदेशी पुरुषाचा फोन आला. त्याने व्हिडीओ कॉलवरील संभाषण पॉर्न हब नावाच्या वेबसाईटवर टाकल्याची माहिती दिली. हा व्हिडीओ वेबसाईटवरुन काढून घेण्यासाठी त्याच्याकडे ४०० युरोची (३३ हजार रुपये) मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी प्रचंड घाबरला असून त्याने नाशिकमधील सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांना संपर्क साधत घडला प्रकार सांगितला. संबंधित गुन्हा हा जर्मनीत घडत असल्यामुळे त्याला त्या देशातच गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दीक्षित यांनी दिला. त्याचाच दुसर्‍या एका मित्राला याच तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याचे देखील पुढे आले आहे. मात्र त्याने अनोळखी व्यक्ती म्हणून रिक्वेस्ट स्वीकारली नाही. त्यामुळे तो या फसवणुकीतून थोडक्यात बचावला.

- Advertisement -

भारतात संकेतस्थळ ब्लॉक

ज्या संकेतस्थळावर नाशिकमधील विद्यार्थ्याचा व्हिडीओ टाकण्यात आला आहे, ते संकेतस्थळ भारतात बॅन करण्यात आले आहे. भारत सरकारने ब्लॉक केलेल्या ७०० संकेतस्थळामध्ये याचा समावेश आहे. मात्र परदेशात ते दिसत असल्याने संबंधित विद्यार्थी कमालीचा घाबरलेला आहे.

संस्कृती, कायद्याची माहिती घ्या

भारतातून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर तेथे कोणाचा धाक नसतो. त्यांना ओळखणारेही फारसे कोणी नसल्याने ते स्वैराचाराचा मार्ग अवलंबू शकतात. म्हणूनच परदेशात शिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी त्या देशाची संस्कृती आणि कायद्यांची माहिती जाणून घ्यावी, असे समुपदेशकांनी सांगितले.

- Advertisement -

मोठ्या टोळीचा हात

दोन मुलांना एकाच मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यातील एक विद्यार्थी फसला. हे दोन्ही सेक्सटींगची प्रकरणे माझ्यापर्यंत आलीत. मात्र, असे अनेक विद्यार्थी असतील ज्यांनी लोकलज्जेस्तव अद्याप तक्रार केलेली नाही. काही मंडळींनी पैसे देऊनही टाकले असतील. महत्वाचे म्हणजे तरुणाला वेगवेगळ्या पुरुषांचे कॉल येत आहेत. शिवाय त्याला फसविणारी परदेशी तरुणी आहे. म्हणजेच मोठी गँग या प्रकरणात असून भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍यांना ते हेरत आहेत.
तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

ही घ्यावी काळजी

  • – सोशल मिडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये
  • कोणाशीही संवाद साधताना नैतिकतेची चाड ठेवावी
  • कोणी ब्लॅकमेल करीत असेल तर संबंधितांनी त्याची माहिती तातडीने पालकांना सांगावी
  • पालकांनीही मुलांच्या संपर्कात सातत्याने राहावे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -