घरमहाराष्ट्रनाशिकगोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद शहरांसाठी इंडिगो देणार मार्चपासून विमानसेवा

गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद शहरांसाठी इंडिगो देणार मार्चपासून विमानसेवा

Subscribe

नाशिक : इंडिगो कंपनीकडून येत्या १५ मार्चपासून ओझर विमानतळाहून सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरीता कंपनीचे पथक शनिवारी ओझर विमानतळाला भेट देणार असल्याचे समजते. गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतिक्षा होती, आता इंडिगोकडून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जाणार असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. २६ मार्चपासून ही सेवा प्रास्तावित होती मात्र त्यापूर्वीच या शहरांकरता नाशिककरांना इंडिगो कंपनीची सेवा मिळू शकेल याची अपेक्षा वाढली आहे.विमानसेवेच्या येत्या उन्हाळी वेळापत्रकापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून नाशिकहून 4 नव्या शहरांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा स्पाईसजेट आणि इंडिगो कंपनीने केली आहे.

त्यात अहमदाबाद, बंगळुरू, नागपूर आणि गोवा या चार शहरांचा समावेश आहे. सद्यस्थितीत या कंपनीची नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-नवी दिल्ली या दोन शहरांसाठीची सेवा सुरू आहे.आता या कंपनीने आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करण्याचे पत्र हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझर येथील नाशिक विमानतळ प्रशासनाला दिले आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. तसेच, विमानतळाच्या ठिकाणी विविध सुविधा आणि सहकार्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -
हैदराबाद-अहमदाबाद 2 शहरांसाठी सेवा

स्पाईसजेट कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. आता स्पाईसजेट आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करणार असल्याने एकूण 5 शहरांसाठी सेवा सुरू होणार आहे. येत्या २६ मार्च ते 28 ऑक्टोबर या काळात स्पाईसजेट ही कंपनी तब्बल आठवडाभर म्हणजेच सातही दिवस नाशिकहून विमानसेवा देण्यास इच्छुक आहे. स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन्ही कंपन्या हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा देणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -