घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकची ओळख टिकवून उद्योगांचा विकास करावा

नाशिकची ओळख टिकवून उद्योगांचा विकास करावा

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळ ः ‘आयमा इंडेक्स 2022’ औद्योगिक प्रदर्शनाचे उदघाटन

नाशिक : नाशिकला अतिशय चांगले हवामान लाभले असून प्रदूषणकारी उद्योग शहराबाहेर उभे राहण्याची गरज आहे. जेणेकरून नाशिक शहराचे हवामान टिकेल. मुंबई पुण्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाले आहे. आता मुंबई-पुण्यानंतर नाशिक हे उद्योजकांसाठी महत्वाचे डेस्टिनेशन ठरत आहे. नाशिक हे मुंबई-पुण्यासारखे नक्कीच झाले पाहिजे. मात्र, इतर शहरात काही चुकीची पाऊले पडली असतील तर त्याचा अभ्यास करून नाशिकमध्ये विकास करण्यात येऊन नाशिकची ओळख टिकविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

डोंगरे वसतीगृह येथे आयोजित ‘आयमा इंडेक्स 2022’चे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, एचएएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपेंदिव मैती, हिरा नंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण, आयमा इंडेक्सचे अध्यक्ष धनंजय बेळे उपस्थित होते.

- Advertisement -

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ते लवकरच सोडविले जातील. नाशिकला चांगले हवामान लाभले आहे.नाशिकची ओळख टिकविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भुजबळांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल यांनी केले. तर यावेळी आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष वरूण तलवार, सेक्रेटरी ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,मनीष रावल, सूर्यभान नाईकवाडे,सुदर्शन डोंगरे, सेक्रेटरी योगिता आहेर, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हे प्रदर्शन २१ मार्चपर्यंत खुले राहणार आहे.

पहिल्याच दिवशी 850 कोटी रुपयांची गुंतवणूक

आयमा इंडेक्सच्या पहिल्याच दिवशी 850 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हिरानंदानी ग्रीनबेस ग्रुप नाशकात सहाशे कोटींची गुंतवणूक करणार आहे. अ‍ॅडव्हान्स एंझाईम (सिन्नर)चे किशोर राठी यांनी शंभर कोटीची गुंतवणूक तर, ज्योयस्टिक एढेसिव्ह कंपनीचे संचालक जयंत जोगळेकर यांनी अमेरिकन कंपनीबरोबर दीडशे कोटीचा करार केल्याचे सांगितले. या सर्व गुंतवणूकदारांचा पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -