घरताज्या घडामोडीबिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

Subscribe

निफाड तालुक्यातील कोठुरे येथील बानेश्वर महादेव मंदिरात शनिवारी (दि.२२) संध्याकाळी ७ वाजेदरम्यान महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेले किर्तन ऐकण्यासाठी दुचाकीवरुन पतीसोबत जात असताना पत्नीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंदाबाई बाळासाहेब मोगल (55) असे जखमी महिलेचे नाव आहे.

महाशिवरात्रीनिमित्त कोठुरे येथील बानेश्वर महादेव मंदिरात किर्तन ऐकण्यासाठी शनिवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान पतीसोबत दुचाकीवरुन जात असताना कोठुरे फाट्यानजीक पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने मंदाबाई यांच्या डाव्या पायाला चावा घेत जखमी केले. दोघांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. जखमी मंदाबाई यांना उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात वन विभागाने कसबे सुकेने व लालपाडी येथे दोन बिबट्यांना जेरबंद केले. सुंदरपूर परिसरात एक मादी व दोन बछड्याचा वावर असून शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागाने कोठुरे परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थ करु लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -