घरमहाराष्ट्रनाशिकखासगी व्यायामशाळांची चौकशी करा, मनसेची मागणी

खासगी व्यायामशाळांची चौकशी करा, मनसेची मागणी

Subscribe

नाशिक : महापालिका हद्दीत रहिवासी संकुलात खासगी व्यायामशाळा सुरू आहेत. महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागांतील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून या व्यायामशाळा रहिवाशी संकुलांत बिनदिक्कत सुरु आहेत, असा आरोप करत व्यायामशाळा संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसे शारीरिक सेनेच्यावतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात सहाही विभागात अनेक व्यायामशाळांनी नियमाविरुद्ध बांधकाम केल्याच्या तक्रारी आहेत. ह्या खाजगी व्यायामशाळांची आपल्या स्तरावरून चौकशी करून नियमाविरुद्ध चालणार्‍या ह्या खाजगी व्यायामशाळा संचालकांवर कायदेशीर कारवाई होणेकामी संबंधितांना निर्देश द्यावेत असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनीं याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील अनधिकृत व्यायामशाळांची चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष कौशल (बब्बू) पाटील, शहराध्यक्ष ललित वाघ, शहर संघटक नवनाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस अक्षय कोंबडे, शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, अक्षय गवळी, सिद्धेश सानप, मेघराज नवले, शुभम गायकवाड, मनिष गुजराथी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -