घरताज्या घडामोडी... त्या रूग्ण संख्येची चौकशी करा : छगन भुजबळ

… त्या रूग्ण संख्येची चौकशी करा : छगन भुजबळ

Subscribe

मुंबई शहरात करोनाचा वाढता प्रसार बघता केंद्रिय पथकाने नुकतीच पाहणी केली. या पाहणीनंतर १५ मे पर्यंत मुंबईत करोना बाधितांचा संख्या ६ लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या निष्कर्षाबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संशय व्यक्त करत ही रूग्णसंख्या आली कुठुन याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर याची कल्पना अगोदरच होती तर, वर्षभरापूर्वीच करोना आजाराविषयी का कळवले नाही असा सवालही त्यानी उपस्थित केला आहे.

मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून तिथे लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याची बाब वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या पथकाने मुंबईत पाहणी केली. या पाहणीनंतर येत्या ८ दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत हाच आकडा ६ लाख ५६ हजारांपर्यंत असू शकेल असा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनाची तयारी आहे का असा सवाल केला असता भुजबळ म्हणाले की, हा आकडा आणला कोठुन अगोदरच याचीच चौकशी व्हायला हवी. जर आपल्याला पुढे काय होणार हे अगोदरच समजत असेल तर मग करोना आजाराविषयी एक वर्षापुर्वीच कल्पना का नाही दिली. मुंबईची लोकसंख्या १ कोटी २५ लाखाच्या आसपास आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता तीनही बाजूने समुद्र आहे. हे शहर दाट लोकवस्तीचे आहे. इतक्या गर्दीचे ठिकाण असूनही राज्य शासनाने वेळीच योग्य पावलं उचलल्याने आज मुंबईत परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे उगाचच नागरिकांना घाबरविण्याचे काम करू नये. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होउन याचा उद्रेक होउ शकतो. आरोग्य यंत्रणा, प्रशासन रात्रंदिवस काम करतयं त्यामुळे आशादायक वातावरण निर्माण करायला हवे. अशा दाव्यांनी नकारात्मक वातावरण निर्माण होउ शकते असेही ते म्हणाले.

- Advertisement -

रेशन दुकानदारांना विमा कवच
महाराष्ट्रामध्ये एकूण ५५ हजार रेशनिंग दुकाने आहेत. दुकानदारांना व त्यांच्या कामगारांना धान्य वितरित करताना रेशनिंग दुकानदारांचा, रेशनिंग दुकानातील कामगारांचा दैनदिन रेशनिंगच्या कामामध्ये नागरिकांची संपर्क येतो परंतु तरी ही रेशनिंग दुकानदार व कामगार नागरिकांना सेवा देत आहेत. तसेच रेशनिंग दुकान ते गोडाउन पर्यंत मालवाहतूक करताना गाडीचा ड्रायव्हर , गाडी मधील हमाल गोडाऊनमधील कर्मचारी यांचाही नागरिकांशी संपर्क येतो यामुळे यांची आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे याकरीता त्यांना ५ लाख रूपयांचे विमा सुरक्षा देण्यासाठी अर्थविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -