घरमहाराष्ट्रनाशिकअन्न प्रक्रिया उद्योगात १०० कोटींची गुंतवणूक

अन्न प्रक्रिया उद्योगात १०० कोटींची गुंतवणूक

Subscribe

१० हजार टन क्षमतेच्या शेतमालावर प्रक्रिया करणार

नाशिक जिल्ह्याच्या विंचूर येथे सुरू झालेल्या अन्न प्रक्रिया उद्योगात सुमारे १०० कोटी गुंतवणूक करण्यात येत असून हा आशिया खंडातील सर्वात मोठा अन्नप्रक्रिया उद्योग या ठिकाणी साकारला जात आहे. या प्रकल्पाची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून शेतकर्‍यांना खात्रीशीर आधारभूत किंमत मिळणार असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या कंपनीशी संलग्न होऊन पिकांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. यावेळी त्यांनी एम.आय.डी.सी चे अधिकारी आणि शेतकर्‍यांसमवेत अन्न प्रक्रिया उद्योगाची पाहणी करून कंपनी आणि शेतकरी यांना मार्गदर्शन केले.

श्री शिवसाई एक्स्पोर्ट अँड पॉलिशेट्टी सोमासुंदरम ऍग्रो एक्स्पोर्ट कंपनीचे संचालक सांबाशिव राव, नरेश चौधरी, मुख्य समन्वयक शिवदास आव्हाड, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर रेड्डी यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रसामग्री बसवून मका व इतर शेतमालावर केली जाणारी प्रक्रिया यावेळी पाहायला मिळाली. या ठिकाणी प्रतीवर्षी सुमारे १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार आहे. या ठिकाणी शेतमालाचे १० हजार टन क्षमतेचे गोडावून उभारण्यात आले आहे. यामध्ये टिकाऊ माल जास्त काळ साठवला जाईल तसेच टिकाऊ नसलेल्या कांद्यावर त्वरित प्रकिया केली जाईल त्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळणार असून कांद्याचे नुकसान टळणार आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, परिसरातील स्थानिक नागरिक आणि शेतकर्‍यांनी कंपनीच्या लोकांना सहकार्य करावे कारण सदर कंपनी शेतकर्‍यांशी करार करून खात्रीशीर हमीभाव देणार आहे. आधारभूत भावापेक्षा कमी बाजारभाव असला तरीही हमीभावाप्रमाणे दर देणार आणि हमीभावापेक्षा बाजारात जर जास्त भाव असेल तर बाजारभावाप्रमाणे अधिकचा दर शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. शेतमालाचे पैसे धनादेशाने त्वरित मिळणार आहेत. तसेच येथील स्थानिक बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी वर्ग तसेच एम.आय.डी.सी चे कार्यकारी अभियंता दुष्यंत उईके, उपअभियंता नितीन पाटील, एस.एस.पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, परिसरातील स्थानिक नागरिक आणि शेतकर्‍यांनी कंपनीच्या लोकांना सहकार्य करावे कारण सदर कंपनी शेतकर्‍यांशी करार करून खात्रीशीर हमीभाव देणार आहे. आधारभूत भावापेक्षा कमी बाजारभाव असला तरीही हमीभावाप्रमाणे दर देणार आणि हमीभावापेक्षा बाजारात जर जास्त भाव असेल तर बाजारभावाप्रमाणे अधिकचा दर शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. शेतमालाचे पैसे चेक स्वरूपात त्वरित मिळणार आहे. तसेच येथील स्थानिक बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळणार आहे. यासाठी प्रशिक्षण मिळणार असल्याने कुशल कामगार तयार होतील. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे व शेतकर्‍यांच्या उत्पन्नाला आधारभूत भाव मिळवून देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

१० हजार शेतकर्‍यांसमवेत करार

या ठिकाणी इतर शेतीमालाबरोबरच प्रामुख्याने कांदा निर्जलीकरण प्रकल्प साकारत असल्याने कांद्याच्या भावाच्या प्रश्नावर काही अंशी तोडगा निघणार आहे. करार शेतीद्वारे हजारो शेतकर्‍यांना संलग्न केले जाणार आहे. आतापर्यंत सुमारे १० हजार शेतकर्‍यांबरोबर करार करण्यात आले आहेत. कमी खर्चात शेतकर्‍याच्या मालाचे अधिक उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन करून शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना माफक दरात उच्च प्रतीचे बियाणे देण्यापासून तर त्यांचा माल विकत घेण्यापर्यंत मार्गदर्शन व सहाय्य केले जाणार असल्याचे यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -