Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम इराणी टोळीच्या पोलीस आवळणार मुसक्या; पथके रवाना

इराणी टोळीच्या पोलीस आवळणार मुसक्या; पथके रवाना

Subscribe

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

नाशिक : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी नाकाबंदी सुरु आहे. सोनसाखळी चोरीमध्ये स्थानिक चोरटे आणि इराणी टोळीचा हात असण्याची शक्यता आहे. इराणी टोळीला अटक करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांची दोन पथके परराज्यात गेली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.

नाशिक शहरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. शहरात सोनसाखळी चोरटे आणि वाहनचोरटे सक्रिय झाले आहेत. दीड तासांत पंचवटी, म्हसरुळ, इंदिरानगरमध्ये दोन वयोवृद्ध महिला आणि एका ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावल्याचे समोर आले. तसेच, चोरट्यांनी लग्नसोहळ्यास येणार्‍या महिलांना लक्ष केल्याच्याही अनेक घटना घडत आहेत. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाशिक शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरु केला आहे. तसेच, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी सुरु केली आहे. पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी लाचप्रकरणी आडगाव आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षात हजर होण्यास सांगितले. त्यांना थेट पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करावे लागत आहे. परिणामी, शहरातील १२ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करत आहेत. तसेच, पोलीस गुन्ह्यांचा आढावा घेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

काय म्हणाले पोलीस आयुक्त

- Advertisement -

* नाशिक शहरात किरकोळ कारणांवरुन नागरिक संतप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
* जाळपोळ करणारे संशयित तरुणांवर पोलिसांचा वॉच आहे.
* गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जात आहेत.
* शहरात सकाळी आणि सायंकाळी नाकाबंदी केले जात आहे.
* नाकाबंदीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माय होते आहे.

तीन खुनातील आरोपींची चौकशी सुरु

नाशिक शहरात तीन खून झाले आहेत. म्हसरुळ येथे बुधवारी (दि.१८) रात्री ९ वाजेदरम्यान मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी झालेल्या यश गांगुर्डे याचा टोळक्याने खून केला. गुरुवारी (दि.१९) गुरुवारी सायंकाळी आनंदवलीमध्ये मित्रांनी प्रथमेश खैर याचा खून केला. तर शुक्रवारी (दि.२०) पहाटे ४.३० वाजता मद्यधुंद तरुणांनी हरीश भास्कर पाटील याचा खून केला. या तिन्ही घटनेतील आरोपींना अटक केली आहे. त्यांची पोलीस चौकशी केली जात आहे. त्यातून आणखी माहिती समोर येईल, असे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.

खुनांमध्ये समान धागा नाही

- Advertisement -

म्हसरुळ, भद्रकाली आणि गंगापूर हद्दीतीन खुनाच्या घटनेत समान धागा नाही. तिन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. खुनाच्या तिन्ही घटनेतील आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आणखी माहिती उघडकीस येणार आहे : जयंत नाईकनवरे पोलीस आयुक्त, नाशिक

 

- Advertisment -