घरमहाराष्ट्रनाशिकअधिवेशनातही गाजला नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न

अधिवेशनातही गाजला नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न

Subscribe

भुजबळांनी केला मुद्दा उपस्थित

नाशिक : खड्ड्यांमुळे गेल्या चार महिन्यांपासून त्रस्त झालेल्या नाशिककरांची ही व्यथा माजी पालकमंत्री छगन भुजबळांनी हिवाळी अधिवेशनात मांडली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्त संस्था नियुक्तीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केल्याचे सांगितले.

महानगरपालिकेने गेल्या अडीच वर्षात रस्त्यांच्या कामावर सुमारे साडेसहाशे कोटी खर्चूनही पावसाळ्यात रस्त्यांची अक्षरशः पुरेवाट लागली होती. या खड्ड्यांविरोधात विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागासह गुणवत्ता नियंत्रण विभागाची असल्यामुळे शासनाने या तक्रारींची चौकशी केली आहे का, असा सवाल भुजबळांनी उपस्थितीत केला होता. शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता दर्जाहीन असल्याचा तारांकित प्रश्न भुजबळांनी मांडला होता. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत महापालिकेला असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागासह गुणवत्ता नियंत्रण विभागाची असल्यामुळे शासनाने या तक्रारींची चौकशी केली आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला होता. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे विविध संघटनांकडून महापालिकेस निवेदने प्राप्त झाली होती.

- Advertisement -

याबाबत आंदोलनेही करण्यात आली, ही बाब खरी आहे. महापालिकेमार्फत गेल्या तीन वर्षात रस्त्यांच्या कामांकरिता ४८९.७२ कोटी खर्च करण्यात आले. शहरात सद्यस्थितीत भुयारी गटार, पाणीपुरवठा, गॅस पाईपलाईन, रिलायन्स, एअरटेल, जिओ फायबर इत्यादी कंपन्यांचे केबल नेटवर्किंगची कामे यामुळे रस्त्यांची खोदकामे, तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक विकासकामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण होण्याच्या दृष्टीने यंत्रणांकडून पुरेपुर दक्षता घेण्यात येते. तसेच, नगरविकास विभागाच्या आदेशानुसार कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था नेमणुकीची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -