घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात भाजपची सरशी

शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात भाजपची सरशी

Subscribe

स्थायी समिती सदस्यपदी डी. के. जगताप

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी आग्रही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरु असताना भाजपने बाजी मारली आहे. अंतर्गत राजकारणामुळे लासलगाव गटाचे सदस्य ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण स्भा बुधवारी (दि.8) प्रत्यक्ष सभागृहात पार पडली. स्थायी समितीसह विविध समित्यांवरील रिक्त जागांसाठी विविध समित्यांवरील सदस्यांची निवड प्रक्रीया पार पडली.निफाडचे राष्ट्रवादीचे सिध्दार्थ वनारसे व शिवसेनेचे दीपक शिरसाठ यांच्यात अखेरपर्यंत सहमती न झाल्याने दोघांनाही माघार घ्यावी लागली. एकिकडे एका जागेसाठी रस्सीखेच सुरु असताना दुसर्‍या विषय समित्यांना पुरेसे अर्जही न आल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून अपक्ष यतिन कदम यांचे सदस्यत्व रिक्त झाल्याने या रिक्त जागेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच होती.

- Advertisement -

जागा भाजपची असल्याने भाजपला मिळावी यासाठी गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेने या जागेसाठी हट्ट केला. राष्ट्रवादीकडून सिध्दार्थ वनारसे व दीपक शिरसाठ यांनी तर, भाजपकडून ज्ञानेश्वर (डी.के) जगताप यांनी अर्ज दाखल केले. तीन अर्ज प्राप्त झाल्याने निवडणुकीचा पेच निर्माण झाला. त्यामुळे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना गटनेते व पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. यात वनारसे व शिरसाठ माघार घेण्यास तयार नव्हते. पदाधिकार्‍यांच्या समजुतीनंतर शिरसाठ यांना बांधकाम समितीवर घेण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जाते. मात्र, शिरसाठ यांनी लागलीच निवड करण्याचा आग्रह धरला. मात्र ते शक्य नसल्याने हा तिढा आणखी वाढला. अखेर सर्वांनी समजुत काढल्यानंतर, वनारसे व शिरसाठ यांनी माघार घेतली. त्यामुळे जगताप यांची बिनविरोध निवड झाली. यात निफाड तालुक्यातील आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्यातील राजकीय वैर आडवे आल्याचे बोलले जात आहे.

निवड झालेल्या समित्यांवरील सदस्य

ज्ञानेश्वर जगताप (स्थायी समिती सदस्य), कृषी समिती पुष्पा धाकराव, शिक्षण समिती सुलभा पवार, सुनीता सानप, महिला व बालकल्याण समिती रोहिणी कांगणे व मनिषा पवार, आरोग्य समिती सोमनाथ जोशी, समाजकल्याण समिती सुभाष कुटे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -