घरमहाराष्ट्रनाशिक‘सावाना’ कार्यकारी मंडळात खांदेपालट

‘सावाना’ कार्यकारी मंडळात खांदेपालट

Subscribe

कार्याध्यक्षपदी जयप्रकाश जातेगावकर, सचिवपदी डॉ. धर्माजी बोडके यांची निवड

नाशिक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘सावाना’ संस्थेत शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खांदेपालट झाली. सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना)च्या २०१९-२० या वर्षासाठी कार्याध्यक्ष म्हणून जयप्रकाश जातेगावकर, तर प्रमुख सचिव म्हणून डॉ. धर्माजी बोडके यांची निवड करण्यात आली.

याशिवाय या नूतन कार्यकारिणीत सहायक सचिव-अ‍ॅड. अभिजित बगदे, अर्थ सचिव- शंकरराव बर्वे, ग्रंथ सचिव-गिरीश नातू, नाट्यगृह सचिव-देवदत्त जोशी, सांस्कृतिक कार्य सचिव-डॉ. वेदश्री थिगळे, वस्तूसंग्रहालय सचिव-उदयकुमार मुंगी, अभ्यासिकाप्रमुख-डॉ. शंकर बोर्‍हाडे, बालभवन व डिजिटकलायजेशनप्रमुख-संजय करंजकर, लायब्ररी ऑन व्हीलप्रमुख-बी. जी. वाघ, गंगापूररोड शाखाप्रमुख-प्रा. संगीता बाफणा, मुक्तद्वार विभागप्रमुख-वसंत खैरनार, बी. लिब व एम. लिबप्रमुख-अ‍ॅड. भानुदास शौचे यांचा समावेश आहे. शनिवारी, ६ एप्रिलला झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत ही निवड झाली. प्रा. विलास औरंगाबादकर हे अध्यक्षस्थानी होते.

- Advertisement -

निमित्ताचे धनी बेणी

‘सावाना’ ही नामांकित सांस्कृतिक संस्था असली तरी त्यातील पदाधिकार्‍यांतील राजकारणही सर्वश्रुत आहे. सावानाच्या कार्यकारी मंडळात दोन प्रतिस्पर्धी गट कार्यरत असून त्यांच्यातील रस्सीखेच अनेक निमित्तांनी समोर आली आहे. सांस्कृतिक सचिव श्रीकांत बेणी यांच्या कार्यशैलीविषयी काही सदस्यांत नाराजी होती. कार्यक्षम आमदार पुरस्काराच्या वेळी बेणींच्या वक्तव्यांवरुन वाद झाले. हा वाद नंतर जाणीवपूर्वक वाढविण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर होणारी ही खांदेपालट चर्चेचा विषय न झाला तरच नवल. या नव्या निवडीला तांत्रिक कारण पुढे करुन बेणी यांच्याकडून आव्हान दिले जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -