अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जयंत नारळीकर

JAYANT NARALIKAR
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ९४ व्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

नाशिक- येत्या मार्च महिन्यात नाशिकमध्ये होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे.
नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये रविवारी (दि.24) संमेलनाच्या आयोजकांची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला. येत्या 26 ते 28 मार्च 2021 या कालावधीत होणार्‍या साहित्य संमेलनाची रुपरेषा ठरवण्यात आली. लेखक, कवी यांना यात बोलवण्यात येणार आहे. अध्यक्षपदाची निवड करताना एक तासभर चर्चा झाली. अध्यक्षपदासाठी जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांची नावे स्पर्धेत होती. परंतु, साहित्य मंडळाच्या संस्था व संलग्न संस्थांकडून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर, विज्ञानवादी लेखक डॉ.बाळ फोंडके, कथाकार भारत सासणे, प्रख्यात लेखिका सानिया, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे आणि लेखक प्राचार्य जनार्दन वाघमारे यांच्या नावाचे प्रस्ताव महामंडळाकडे आले.