घरताज्या घडामोडीफ्रीज दुरूस्तीच्या बहाण्याने दागिणे लंपास

फ्रीज दुरूस्तीच्या बहाण्याने दागिणे लंपास

Subscribe

फ्रीज दुरूस्तीसाठी आलेल्या संशयिताने घरातील किचनमध्ये ठेवलेले ८० हजार रूपयांचे दागिणे लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.१८) सायंकाळी अमृतधाम येथील साईनगरमधील स्क्मिणी हाईट्स येथे घडली. याप्रकरणी निलम चंदुमल घेवडे (साईनगर, अमृतधाम, पंचवटी) यांनी पंचवटी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित रंगराव पंडित देवरे (२१, गोपाळनगर, अमृतधाम) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देवरे फ्रीज दुरूस्तीसाठी घेवडे यांच्या घरी आला होता. घरात कोणाचे लक्ष नसल्याचे पाहुण त्याने किचनमध्ये एका वाटीत ठेवलेली सोन्याची चैन लंपास कली, असा आरोप घेवडे यांनी केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. जे. निसाळ करत आहेत.

पेठरोडला युवकाची आत्महत्या

राहत्या घरी गळफास लावून युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (दि.१८) सायंकाळी पेठरोड परिसरात उघकीस आला. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दिपक रमाकांत गुप्ता (२३, रा. दत्तनगर, पेठरोड) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्ता याने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बेळगावकर चाळीमधील एका खोलीतील छतास साडीने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब नागरिकांना समजताच उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. साळवे करत आहेत.

- Advertisement -

अल्पवयीन मुलाची आत्महत्या

अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.१८) इंदिरानगरच्या महारूद्र कॉलनी येथे घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शिरीष राजेंद्र वाजे (१६,रा. मधुसंच बंगला, महारूद्र कॉलनी, इंदिरानगर) असे आत्महत्या करणार्‍या मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरीष याने सोमवारी पहाटे ३ वाजेपुर्वी बेडरूममध्ये छतास गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांना सकाळी समजली. कुटुंबियांनी उपचारार्थ त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हादगे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -