Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक कब्बडी प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

कब्बडी प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

Related Story

- Advertisement -

नाशिक : येथील कब्बडीपटू आणि प्रशिक्षक प्रशांत भाबड (50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. अखेरीस उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत निधन झाले. कबड्डीच्या अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्यानंतर ते सध्या नाशिक शिक्षक प्रसारक मंडळाच्या रुंग्टा शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. नाशिकमध्ये अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा संयोजनात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. नाशिक जिल्ह्यात अनेक कबड्डीपटूही त्यांनी घडवले. राज्याच्या किशोरवयीन कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम बघितले होते. रुंग्टा हायस्कूल तसेच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

- Advertisement -