कैलास शहाला न्यायालयीन कोठडी

मुख्य सूत्रधार कैलास जोगेंद्रप्रसाद शहा

रोलेटकिंग कैलास शहाची पोलीस कोठडीतील मुदत संपल्याने ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि.१३) त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दिलीप मेढे यांचा मुलगा संदिप मेढे याने शेतजमीन विक्रीतून आलेले ३५ लाख रुपये रोलेटमध्ये हरल्याने आणि कैलास शहाच्या त्रास, धमकी आणि दहशतीला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी दिलीप मेढे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात कैलास शहा, शांताराम पगार आणि सुरेश वाघविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फरार असलेल्या शांताराम पगार व सुरेश अर्जुन वाघ यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी बुधवारी(दि.१०) मुख्य सूत्रधार कैलास शहा यास अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.