कपालेश्वर मंदिरात पाकिटमारी करणार्‍या महिला ताब्यात

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पंचवटी पोलिसांची कारवाई

kapaleshwar
कपालेश्वर मंदिर

कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या पर्स व पाकिटांवर डल्ला मारणार्‍या औरंगाबाद येथील दोन महिलांना पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि. २६) अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या महिलांना अटक केली. रामकुंडानजीकचे श्री कपालेश्वर मंदिर येथे वर्षभर देश-विदेशातील भाविक व पर्यटकांची गर्दी असते. भाविकांच्या या श्रद्धेचा आणि येथील गर्दीचा गैरफायदा घेत या महिला पर्स आणि पाकिटातील पैसे व मुद्देमाल लंपास करत होत्या. दोन दिवसांपूर्वी कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या युवतीच्या पर्समधून १२०० रुपयांची रोकड आणि एटीएम कार्ड, तसेच अन्य वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर युवतीने पंचवटी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी माग काढत गोदा घाटावरून काही वेळातच या महिलांना अटक केली.

यांना केली अटक

ओळख पटल्यानंतर पोलिसांनी संशयित शीतल सदाशिव पवार आणि लैला काळे यांना अटक केली. या दोघींसोबत फुटेजमधील एक युवती अल्पवयीन असल्याचे समजते. पोलीस चौकशीत या महिलांनी चोरीची कबुली दिली.