घरमहाराष्ट्रनाशिकहजारोंच्या मेळाव्यात खडसे ‘एकाकीच’

हजारोंच्या मेळाव्यात खडसे ‘एकाकीच’

Subscribe

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापन मुख्य समितीतून डच्चू दिल्यानंतर नाशिकधील युतीच्या मेळाव्यातही त्यांना भाषणास मज्जाव करण्यात आला. मेळाव्यातील खडसे यांचा वावर आणि त्यांच्यापासून दूरावलेले ‘भाजपेयी’ बघता खडसे आणि राज्याचे नेतृत्व यांच्यात अद्याप मनोमिलन झाल्याचे दिसतच नाही.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापन मुख्य समितीतून डच्चू दिल्यानंतर नाशिकधील युतीच्या मेळाव्यातही त्यांना भाषणास मज्जाव करण्यात आला. मेळाव्यातील खडसे यांचा वावर आणि त्यांच्यापासून दूरावलेले ‘भाजपेयी’ बघता खडसे आणि राज्याचे नेतृत्व यांच्यात अद्याप मनोमिलन झाल्याचे दिसतच नाही. तरीही झालं गेलं विसरून युतीसाठी काम करणार असल्याचे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले त्यामुळे अनेकांची झोप उडाली, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथील एका कार्यक्रमात केले. त्यानंतर काही दिवसांनी भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन मुख्य समितीतून खडसे यांना डच्चू देण्यात येऊन त्यांच्या जागी गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे नाशिकमधील मेळाव्याला खडसे उपस्थित राहणारच नाहीत, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात स्नुषा खासदार रक्षा खडसेंसह ते मेळाव्यास जातीने आणि सर्वप्रथम उपस्थित राहिले. त्यांच्याबरोबर अनेक नवीन कार्यकर्त्यांनी सेल्फी घेतली; परंतु भाजप नेत्यांनी मात्र त्यांच्या जवळपास न फिरकणेच पसंत केले. त्यांची विचारपूस केली तरीही आपल्यावर बालट येईल या भीतीनेच भाजपमधील नेते मंडळी त्यांच्यापासून दोन हात दूर होते. याउलट सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे खडसे यांना आवर्जुन भेटण्यासाठी आलेत. मेळाव्यात व्यासपीठावर बसण्यासही खडसेंनी नकार दिला होता; परंतु मेळाव्याचे आयोजक ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांनी त्यांना आग्रहाने व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात खडसेंचा अगदीच ओझरता उल्लेख आला. उद्धव ठाकरे यांनी खडसे यांच्या भाषणाचा दाखल देत युतीचे महत्व पटवून दिले. महत्वाचे म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होऊच नये म्हणून खडसे यांनी आग्रह धरला होता. मात्र, आता पत्रकारांजवळ खडसे युतीचे गोडवे गाताना दिसले. ते म्हणाले, युती नसल्याने भाजप- शिवसेनेला नाईलाजाने दुसर्‍यांबरोबर जमवून घ्यावे लागत होते. मात्र, आता युती झाल्याने यश नक्कीच येईल.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अत्यंत कुशल आहे. मागील विधानसभा निवडणुकीत युती नसावी हा सामूहिक निर्णय होता. मी फक्त घोषणा केली होती. तो माझा वैयक्तिक निर्णय नव्हता. भाजपाला उत्तर महाराष्ट्रातून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जळगाव मतदार संघाने १९८९ पासून आजवर आठ निवडणुकांत भाजपाला निवडून दिले आहे. शिवसेनेचेही जागा नेहमीच राहिलेली आहे. त्यामुळे युतीच्या या बालेकिल्ल्यात यंदाही चांगली साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतर्गत कुरबुरी आणि कटुतेबाबतही त्यांनी मनमोकळी भूमिका मांडली. युती नसताना एकमेकांविरोधात कटुता निर्माण झालेली होती, काही कुरबुरी होत्या. त्या दूर करण्यासाठीच आम्ही मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आलोय. कटुता ही वैयक्तिक पातळीवर होती. सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत. मी गेल्या ४० वर्षांपासून संघटनात्मक काम करतो आहे. हे काम यंदाही सुरू राहील.

सुजयकडे जास्तच लक्ष

हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभलेल्या या मेळाव्यात एकनाथ खडसे हे एकटे पडलेले दिसत होते. दुसरीकडे भाजपमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेशित झालेले सुजय विखे पाटील यांचा वारंवार नामोल्लेख करीत त्यांचे महत्व वाढवताना दिसत होते.

- Advertisement -

सारं काही स्नुषा रक्षा खडसेंसाठी

जळगाव लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता वर्तवण्यात येत आहे. अन्य पक्षांची जळगावातील अवस्था बघता खडसे यांना भाजपशिवाय सध्या तरी अन्य पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी भाजप नेत्यांशी ‘मनोमिलन’ सुरू केल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -