Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र ‘लॉकअप’मध्ये खरेला भेटली महिला अधिकारी; पोलीस नेमक करतात काय?

‘लॉकअप’मध्ये खरेला भेटली महिला अधिकारी; पोलीस नेमक करतात काय?

Subscribe

नाशिक : लाचखोरीप्रकरणी निलंबित असलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास त्याच्या संपर्कातील एक महिला कडकोटे पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये भेटल्याचे समोर आले आहे. त्यास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीसुद्धा दुजोरा दिला आहे. लॉकअप ऐरवी कोणत्याही आरोपीच्या नातेवाईकांना भेटता किंवा बोलता येत नाही. मात्र, ती महिला कोणत्या पोलीस अधिकार्‍याच्या इशारावर चक्क लॉकअपपर्यंत जात सतीश खरेला भेटली, असा प्रश्न समोर आला आहे.

जिल्ह्यात सर्वात मोठी आणि दुसर्‍या कोणलाही कमिशन मिळू नये म्हणून स्वत:च्या घरी तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेणार्‍या निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरेचे दररोज कारनामे समोर येत आहेत. जिल्हा उपनिबंधक पदावर असल्यापासून खरे याने कोट्यवधी रुपयांची अपसंपदा गोळा केल्याची चर्चा आहे. खरे याला ३० लाख रुपये लाच घेताना एसबीने अटक केली असली त्याला त्याचे काहीच वाटत नसल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खरेची सखोल चौकशी करत त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा केले जात आहे. पथकाकडून त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. त्याला अटक झाल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे कौतूक केले असले तरी काही अधिकार्‍यांना आजही तो आपल्या जवळचा अधिकारी वाटत आहे. परिणामी, लाचप्रकरणात तो पोलीस कोठडीत असतानाही काही अधिकारी त्याच्या बाजूने बोलत आहेत.

- Advertisement -

लाचप्रकरणी सतीश खरे याला जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तो भद्रकाली पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे. लॉकअपमध्ये आरोपी असल्यास पोलिसांची कडक सुरक्षा असते. शिवाय, आरोपी ज्या लॉकअप असतो, त्याच्या आजूबाजूचा परिसर सीसीटीव्ही कॅमेरे निगराणीखाली असतात. आरोपीपर्यंत कोणालाही न्यायालय आणि पोलिसांच्या परवानगीने जात येत नाही. विशेष म्हणजे, लाचखोरी प्रकरणातील आरोपीपर्यंत त्याच्या नातेवाईक किंवा परिचित व्यक्तीस संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी किंवा कर्मचार्‍यांनी जावू द्यायचे नसते. लॉकअपची चावीसुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांकडे असते. मात्र, सतीश खरे याला त्याच्या सोबत काही वर्षे काम केलेली एक महिला भेटल्याचे समोर आले आहे. ही महिला थेट आरोपीपर्यंत कशी जावू शकते, तिला कोणी अडविले का नाही, पोलीस ठाणे सीसीटीव्हीमध्ये असतानाही संबंधित महिला त्याच्यापर्यंत कशी जाते, असे अनेक यानिमित्ताने समोर आले आहेत. त्या महिलेने त्याच्याशी कोणता संवाद साधला, त्यावेळी तिच्याकडे मोबाईल असल्याची शक्यता आहे. खरे याने त्या महिलेला आर्थिक व्यवहारांची माहिती दिली असण्याची शक्यता आहे.

लॉकअपमध्ये सतीश खरे यास कोण भेटले माहिती नाही. त्यास कोण भेटले, याची सीसीटीव्ही फुटेजनुसार पाहणी केली जाईल. : शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -