घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखरेंचे खोटे कारनामे : थेट पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांकडे देखील खरेची...

खरेंचे खोटे कारनामे : थेट पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांकडे देखील खरेची तक्रार

Subscribe

नाशिक : लाचखोर सतीश खरे याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे. येवला मर्चंट्स बँकेचे संचालक व भाजपचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांनी ही तक्रार केली आहे. सतीश खरे यांनी नोकरीस लागल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी काम केले, तेथे अशाच प्रकारे भ्रष्टाचार केला असून त्याचीही सखोल चौकशी व्हावी. जिल्ह्यातील उत्तम स्थितीत चालणार्‍या सहकारी संस्था अडचणीत आणण्याचे काम केले. भ्रष्टाचारातून किमान १०० कोटींची माया जमविली असून अवैध मालमत्ता खरेदी केल्या आहेत. खरे याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्याची मागणी धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे.

सरकारचे प्रशासनावर नियंत्रणच नाही- माकप

खरे प्रकरणामुळे शिंदे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नसून भ्रष्ट अधिकारी व राज्यकर्त्यांच्या खासगी मालमत्ता जप्त करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्ट अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडण्याची मालिकाच सुरू आहे. पाच लाखांपासून ३० लाखांची लाच घेण्यापर्यंत अधिकार्‍यांची मजल गेली आहे. राजकीय शक्ती आणि अधिकारी सामान्य जनतेची कायदेशीर कामे करण्यासाठी अडवणूक करून त्यांची लूट करत आहेत. भ्रष्ट अधिकार्‍यांच्या मालमत्ता जप्त कराव्या, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे नेते सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. वसुधा कराड, अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी केली आहे.

- Advertisement -

लाचखोर जिल्हा हिवताप अधिकार्‍यासह तिघांना कोठडी

वेतन काढून देण्यापोटी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच मागणार्‍या जिल्हा हिवताप अधिकार्‍यासह दोन आरोग्यसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली दगडू पाटील, जिल्हा हिवताप विभागाचे आरोग्य सेवक संजय रामू राव, आरोग्य सेवक कैलास गंगाधर शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वैद्यकीय रजेचा पगार काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बुधवारी (दि.१७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली पाटील, आरोग्यसेवक संजय राव, कैलास शिंदे यांना अटक केली. पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्यांनी आणखी कोणाकडून लाच घेतली आहे का, याचा तपास पथकाकडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -