घरक्राइमअपहृत मुलगी काही तासांत सापडताच आईचे अश्रू अनावर

अपहृत मुलगी काही तासांत सापडताच आईचे अश्रू अनावर

Subscribe

अंबड पोलिसांची कामगिरी; संशयित ताब्यात

नाशिक । अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणार्‍या संशयिताला पोलिसांनी अटक करून अपहृत मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. आपली मुलगी काही तासांतच अनपेक्षितपणे परत कुशीत विसावताच आईला अश्रू अनावर झाले. दरम्यान, अंबड पोलिसांच्या या दमदार कामगिरीबद्दल अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
या घटनेबद्दल सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिताकुमारी जितेंद्र भारती (२५, व्यवसाय-मजुरी, रा. बिल्डिंग नंबर ६, पाचवा मजला, घर नं. ५११, चुंचाळे शिवार घरकुल, अंबड) या कामावर गेल्या असता त्यांची मुलगी सुमिया जितेंद्र भारती (वय दीड वर्षे) हिचे रविवारी (दि. २९) सायंकाळी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून अपहृत मुलीचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस शिपाई हेमंत आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुलीचे अपहरण एका व्यक्तीने केल्याचे समजले. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस अंमलदार हेमंत आहेर, दिनेश नेहे, जितेंद्र वजिरे, सम्राट मते, सुवर्णा सहाणे यांच्या पथकाने सापळा रचत संशयिताला अटक केली व त्याने ज्या ठिकाणी दीड वर्षाच्या मुलीला ठेवले होते तेथून तिची सुखरूप सुटका केली. या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयिताने दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यामागे नेमके कारण काय व त्याचे इतर साथीदार आहेत का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -