Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र तीन महिन्यांनंतरही अपहृत मुलगी बेपत्ताच; आई-वडिलांसमोर केले होते अपहरण

तीन महिन्यांनंतरही अपहृत मुलगी बेपत्ताच; आई-वडिलांसमोर केले होते अपहरण

Subscribe

नाशिक : मुलीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाने मुलीच्या आई-वडिलांवर दबाव आणण्यासाठी स्वतःच्या हातावर चाकू मारून घेत तिला पळून नेल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. यावेळी तरुणाने आई-वडिलांना व भाऊ- बहिणींना बघून घेण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित आरोपी राजरत्न भवाळेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तीन महिन्यांनंतरही आपली मुलगी घरी परत आलेली नाही. तिचा मोबाईलही बंद लागत असल्याची व्यथा पिडीतेच्या आईने ‘माय महानगर’शी बोलताना व्यक्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपी भवाळे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित राहत असलेल्या परिसरात संशयित आरोपी भवाळे राहतो. त्याने मुलीशी ओळख वाढवली. ही बाब मुलीच्या आईवडिलांना समजली होती. त्यांनी मुलीला त्याच्याशी भेटण्यास व बोलण्यास मनाई केली होती. काही दिवस भवाळे शांत राहिला. त्याने पुन्हा तिच्या बोलणे सुरु केले. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ऐकत नव्हता. त्यामुळे मुलीच्या आई- वडिलांनी भवाळे याच्या आई-वडिलांना व नातेवाईकांना बोलवून सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी भवाळे याने चाकूने स्वतःच्या हातावर मारून घेत मुलीच्या आई-वडिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो मुलीला घेऊन पळून गेला.

- Advertisement -

तिच्या आईवडिलांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कोठेही सापडली नाही. त्याने तिचे अपहरण केले आहे, असा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित भवाळेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होवून दोन महिने झाले तरी मुलीचा ठावठिकाणा अद्यापपावेतो पोलिसांना समजलेला नाही. तिच्या शोध लागत नसल्याने आई, वडील व नातेवाईक चिंतेत आहेत. पीडितेच्या आईने ‘माय महानगर’शी संपर्क साधत आपली व्यथा मांडली.

आमच्या तक्रारीनंतर मुलाच्या आई- वडिलांना दोन महिन्यांसाठी तरुंगात टाकण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुलीची सुटका झालेली नाही. तिचे आधारकार्ड आणि तत्सम कागदपत्रे माझ्याकडेच आहेत. शिवाय या कागदपत्रांवर माझाच मोबाईल नंबर असल्याने दुसरे कार्ड काढायचे असले तरी ओटीपीसाठी मलाच विचारणा होईल. मात्र अद्याप तशी हालचालही न झाल्याने चिंता वाटतेय. : पीडितेची आई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -