घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसराफाचे अपहरण; धमकी देत लाखोंचे दागिने लुटले, नाशकात भरदुपारी थरार

सराफाचे अपहरण; धमकी देत लाखोंचे दागिने लुटले, नाशकात भरदुपारी थरार

Subscribe

दररोज कोट्यवधींची उलाढाल होणार्‍या नाशकातील सराफ व्यावसायिक मात्र सुरक्षित नसल्याचे आजवर अनेक घटनांतून पुढे येत आहे. बुधवारी भरदिवसा एका सराफ व्यावसायिकाचे टोळक्याने अपहरण करुन निर्मनुष्य ठिकाणी नेत दुकानाची चावी घेत दागिने व रोकड लंपास केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिल्यास मारुन टाकण्याची धमकी टोळक्याने दिल्याची धक्कादायक घटना घडली.

बुधवारी (दि.४) दुपारी दीड वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरच्या हिरामोती कार ते स्वराज्य नगरदरम्यान घडलेल्या या घटनेने शहरातील सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संजय साधन बेरा यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय बेरा हे अंबड येथून आपल्या दुकानात दुचाकीवरुन जात होते. तीन चोरटे दोन दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. टोळक्याने त्यांच्या दुचाकीचा रस्ता अडवला. त्यातील एकजण त्यांच्या दुचाकीवर बसला. त्यानंतर त्याने ठार मारण्याची धमकी दिली. त्यांना स्वराज्य नगर परिसरातील जंगल झाडीमध्ये नेवून तलवारीच्या मुठीने मारहाण केली. संशयितांनी त्यांच्याकडील ९० हजार रुपये रोख, १० हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र, ५२ हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन, १९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे टॉप्स जोड, मोबाईल असे एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल टोळक्याने संजय बेरा यांच्याकडून हिसकावून घेतले.

संशयितांनी त्याच्यांकडील सराफ दुकानाच्या चाव्या हिसकावून घेतल्या. त्यातील एकाने त्या चाव्यांव्दारे बेरांचे सराफ दुकाने उघडले. संशयिताने बेरा यांच्या दुकानातून ३३ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या नाकातील ४० मुरण्या खडे, ३६ हजार रुपयांच्या सोन्याचे १२ ओम पान, १९ हजार ५०० रुपयांच्या १३ सोन्याच्या अंगठ्या, २७ हजारांच्या सोन्याच्या कानातील कुडकांचे ९ जोड, ३६ हजारांचे टॉप्स, १८ हजारांचे वाटी मंगळसूत्र, ४८ हजारांचे सोन्याचे सुट्टे मणी असा एकूण २ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनतर त्यांच्याजवळ येऊन पोलिसांत तक्रार करशील तर तुला मारुन टाकू, अशी धमकी देवून संशयित पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.

- Advertisement -

संशयितांचे शोध सुरु

चोरी झाली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे. दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे, असे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -