घरमहाराष्ट्रनाशिककाळाराम मंदिरात तब्बल साडेचारशे किर्तनकारांचा कीर्तन मेळा; 'या' निमित्ताने सोहळा

काळाराम मंदिरात तब्बल साडेचारशे किर्तनकारांचा कीर्तन मेळा; ‘या’ निमित्ताने सोहळा

Subscribe

नाशिक : नाशिकचे वैभव असलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरातील १९४८ सालापासून सुरू झालेल्या दररोजचे नित्य कीर्तन सेवेस ७५ वे वर्षे सुरू होत आहे यानिमित्ताने किर्तन महोत्सव व नारद जयंती उत्सव ६ ते ८ मे २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या महोत्सवासाठी परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य संकेश्वर करवीर पीठ स्वामीश्री सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामी हे अध्यक्ष पद भूषवणार आहे. तसेच या महोत्सवात महाराष्ट्रातून साधारणपणे साडेचारशे नामवंत किर्तनकार उपस्थित राहणार असून किर्तनकारांमधील नव्याने शिक्षण घेऊन धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तत्पर असलेली तरुण किर्तनकार मंडळी या महोत्सवात कीर्तनाचे कार्यक्रम करणार आहे. तर काही ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकार यांचे मार्गदर्शनपर प्रवचने होणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थान श्री काळाराम मंदिर अध्यक्ष व विश्वस्त मंडळ, भद्रकाली अखंड कीर्तन सत्र मंडळ, चतुशाखीय ब्रह्मवृंद गायरान ट्रस्ट मंडळ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन माध्यदिन ब्राह्मण संस्था यांच्यासह नाशकातील अनेक कीर्तनप्रेमींचे सहकार्य लाभणार आहेत.

- Advertisement -

अशाप्रकारे तीनही दिवस भरगच्च कार्यक्रम श्री काळाराम मंदिरातील आवारात संपन्न होणार असून या कार्यक्रमाला सर्व नाशिककरांनी किर्तन प्रेमी लोकांनी उपस्थित राहून श्रवणानंदाचा लाभ घ्यावा अशी विनंती कीर्तन मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आदींसह काळाराम मंदिर पुजारी यांनी आवाहन केले आहे.

असे होतील कार्यक्रम

  • शनिवार (दि.६) रोजी सकाळी सात वाजता श्रीराम पंचायतन व देवर्षी नारद महाराज पूजन याने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
  • नऊ वाजता नारद गीत गायन, श्री गुरुवाणी या पुस्तकाचे प्रकाशन व महोत्सवाचे उद्घाटन सत्र संपन्न होईल,
  • साडेदहा वाजता मंगला चरणाचे कीर्तन हभप शशिकांत महाराज उत्पात, पंढरपूर यांचे कीर्तन होईल.
  • सकाळी ११.३० वाजता देवर्षी नारद चरित्र यावर त्र्यंबकेश्वरचे हभप वेदमूर्ती संकेत शास्त्री दीक्षित यांचे प्रवचन होईल.
  • दुपारी अडीच वाजता महोत्सवासाठी आलेल्या कीर्तनकारांचा परिचय सत्र, संवाद व मार्गदर्शन सत्र.
  • दुपारी चार वाजता श्री नारद भक्ती सूत्रे या विषयावर हभप माधवदास राठी महाराज यांचे व्याख्यान होईल.
  • दुपारी साडेपाच वाजता नारद जयंती उत्सवाचे विशेष किर्तन कर्जत येथील हभप श्रीराम बुवा पुरोहित हे करतील.
  • सायंकाळी साडेसात वाजता समर्थ भक्त अमेय महाराज गुणे मुंबई रामदासी कीर्तनाने समाप्ती होईल.
  • रविवार (दि.७) रोजी सकाळी साडेआठ वाजता आळंदी देवाची येथील हभप यशोधन महाराज साखरे यांचे प्रवचन होईल.
  • सकाळी दहा वाजता कीर्तनाची गणुदासी परंपरा या विषयावर हभप डॉ. प्रज्ञा देशपांडे, पुणे यांचे कीर्तन होईल.
  • दुपारी साडेतीन वाजता कीर्तनाची नारदीय परंपरा या विषयावर हभप मकरंदबुवा करंबेळकर,पुणे हे मार्गदर्शन करतील.
  • रात्री आठ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप कैलास बुवा खरे यांचे हरिदासी परंपरेतील विशेष कीर्तन होईल.
  • सोमवार (दि. ८) रोजी सकाळी आठ वाजता मिरज येथील समर्थ भक्त हभप कौस्तुभ बुवा रामदासी यांचे कीर्तन होईल.
  • दहा वाजता कीर्तनाची नारदीय परंपरा या विषयावर रत्नागिरी येथील ह. भ. प. सायली मुळे-दामले यांचे कीर्तन होईल.
  • दुपारी साडेतीन वाजता कीर्तनाची नारदीय परंपरा या विषयावर मुंबई येथील हभप गौरी खांडेकर यांचे कीर्तन होईल.
  • दुपारी साडेपाच वाजता महोत्सवाचे समारोपीय सत्र प्रारंभ होईल, यावेळेस पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे तेरावे वंशज व अधिपती असलेले हभप रावसाहेब महाराज गोसावी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -