घरमहाराष्ट्रनाशिकशहराचा कोंडला श्वास : अतिक्रमणप्रकरणी विभागीय अधिकार्‍यांना नोटीस

शहराचा कोंडला श्वास : अतिक्रमणप्रकरणी विभागीय अधिकार्‍यांना नोटीस

Subscribe

नाशिक : उपायुक्तांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश देऊनही परस्पर केराची टोपली दाखविणार्‍या तसेच, अतिक्रमणांना जबाबदार विभागीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. लाचखोर कर्मचार्‍याच्या प्रकरणावरुन पंचवटी विभागीय अधिकार्‍यांनाही नोटिस बजावण्यात आली आहे. दरम्यान, अतिक्रमणांना जबाबदार विभागीय अधिकार्‍यांना नोटीस बजावून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली.

दरम्यान, पंचवटीच्या विभागीय अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या कारवाईमुळे अतिक्रमणांकडे डोळेझाक करणार्‍या संबंधित सर्वच अधिकार्‍यांना धडकी भरली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांप्रश्नी आपलं महानगरने प्रसिद्ध केलेल्या मालिकेची दखल घेत महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.१५) अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेत अतिक्रमणप्रश्नी गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
  • धोकादायक वाड्यांचा प्रश्न निकाली काढा. असे वाडे पाडून टाकण्याचे प्रभारी आयुक्तांचे आदेश
  • रस्त्यांवर अतिक्रमणे दिसल्यास विभागीय अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित
  • सर्व विभागीय अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त उपायुक्त यांनी दररोज सकाळी दोन तास अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू असेल तिथे जायचे.
  • प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून मोहिमेकडे लक्ष्य द्यावे
  • बांधकाम तोडण्याचे आदेश देऊनही वेळखाऊपणा केल्याचे आढळल्यास संबंधित विभागीय अधिकार्‍यांवर कारवाई होणार
  • अतिक्रमणाच्या समस्येला विभागीय अधिकारीच जबाबदार
  • पंचवटीचे विभागीय अधिाकरी नरेंद्र शिंदे यांना बजावली नोटीस
  • भाजीविक्रेत्या महिलेच्या पतीकडून लाच मागणार्‍या पंचवटीतील पालिका कर्मचार्‍याची विभाग अंतर्गत चौकशी सुरू
  • नवीन नाशिकमधील सत्येन शिंदे यांचीही विभाग अंतर्गत चौकशी होणार
  • सातपूर कार्यालयातील मयूर काळे या कर्मचार्‍याची चौकशी सुरू
  • वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी आणखी दोन विभागीय अधिकार्‍यांवरील कारवाईचा प्रस्ताव उपायुक्त लवकरच वरिष्ठांकडे पाठवणार

एखादे अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाईचे आदेश दिले तर विभागीय अधिकार्‍यांकडून त्याकडे डोळेझाक करण्याचा प्रकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे अशा अधिकार्‍यांच्या शिस्तभंगाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल. यापुढे कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही. : करुणा डहाळे, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -