पेठ तालुक्यातील कोपुर्ली बुद्रूक ग्रामपंचायतीला ‘सुंदर गाव’ पुरस्कार

पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गौरव

पेठ : तालुक्यातील ग्रामपंचायत कोपुर्ली बु.ला पेठ तालुक्यातील सुंदर गाव पुरस्कार पालकमंत्री दादा भुसे यांचे हस्ते सुंदर गाव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने दिला जाणारा नाशिक जिल्हा परिषदेचा आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत पेठ तालुक्यातील कोपर्ली बु. ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींनी या पुरस्कारासाठी सहभाग नोंदविला होता. ग्रामपंचायती त्यांच्या क्षमतेनुसार शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व अपरंपारिक ऊर्जा, पर्यावरण पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध बाबींवर गुणांकन देऊन सुंदर ग्रामपंचायतीची निवड करून तालुका सुंदर गाव पुरस्काराची निवड करण्यात येते. नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री भुसे यांचे हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, ग्रा.पं. विस्तार अधिकारी बापू सादवे, ग्रामसेवक आर.पी नाईक, सरपंच मीराबाई वाघेरे, उपसरपंच भारती चौधरी, सदस्य निवृत्ती वाघमारे, नामदेव भुसारे, निवृत्ती ब्राम्हणे, अश्विनी वाघेरे, सुरेखा महाले, विमल ब्राम्हणे, ताराबाई चौधरी, जगन गावंढे आदी उपस्थित होते.