घर उत्तर महाराष्ट्र मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर बेपत्ता झाला होता मंजूर; आठ दिवसांनी सापडला मृतदेह

मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर बेपत्ता झाला होता मंजूर; आठ दिवसांनी सापडला मृतदेह

Subscribe

नाशिक : पंचक गावातील बेपत्ता युवकाची निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) उघडकीस आली. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकळी रोड भागातील एसटीपी प्लांट येथे युवकाचा कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. युवकाच्या खूनामागील कारण समजू शकले नाही. पोलिसांनी काही संशयित ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय 30) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. (young labour Murder case under Upnagar Police station area, Nashik)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी रोड परिसरातील एसटीपी प्लँट परिसरात सोमवारी (दि.11) दुपारी गायकवाड याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्यात आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.

- Advertisement -

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना एक मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे दिसले. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या छातीवर खोलवर जखमा दिसून आल्या. शिवाय, चेहर्‍यावर सिमेंट टाकलेले आढळून आले. मृतदेह सात ते आठ दिवसापासून टाकून दिल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला.

पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. ज्ञानेश्वर गायकवाड हा मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. नाशिकरोड पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आठपूर्वी केली मित्रांसोबत पार्टीे

- Advertisement -

ज्ञानेश्वर गायकवाड याने 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्रासोबत पार्टी करण्यासाठी घरातून मांसाहारी जेवण बनवून घेतले. त्यानंतर तो दुचाकीवरून मित्रांसोबत गेला. मात्र तो परत घरी आला नाही. याप्रकरणी पत्नी, वडील व शेजार्‍यांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. शेवटी पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड हिने नाशिकरोड पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

गुराख्यामुळे झाला खूनाचा उलगडा

सोमवारी दुपारी पंचक गावातील सोमनाथ बोराडे हे आपल्या गायी व म्हशी घेऊन पंचक येथील मलनिस्सारण गोदावरी नदीकिनारी जंगल भागात गेले. त्यांना उग्र वास येऊ लागल्याने ते जवळ गेले असता त्यांना पालापाचोळ्यात मृतदेह दिसून आला. त्यांनी गावकर्‍यांच्या मदतीने नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली.

- Advertisment -