नाशकात लाखो गणेशमूर्तींचं संकलन

गेल्या वर्षी एक लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे झालं होतं संकलन

Ganesh Idol Collection Nashik

कोरोना काळातील नियमांमुळे सार्वजनिक मंडळांची घटलेली संख्या, शाडूच्या मूर्ती घरच्या घरी विसर्जित करण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन, पीओपींच्या मूर्ती घरच्या घरी विसर्जीत करण्यासाठी अमोनियम बायोकॉर्बोनेट पावडरचे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले वाटप आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाविषयीची सकारात्मक मानसिकता या सर्वांची परिणिती म्हणजे यंदा गणपती मूर्ती विसर्जनासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी झाली आहे. असे असतानाही यंदा यंदा लाखो मूर्तींचे संकलन विविध सामाजिक संस्था आणि महापालिकेने केले. गेल्या वर्षी एक लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे संकलन झाले होते. केवळ मूर्तीच नाही तर निर्माल्य देखील मोठ्या प्रमाणात संकलीत झाले आहे.

नैसर्गिक विसर्जन स्थळे

नाशिक पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम

सातूपर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशीपूल, मते नर्सरी पूल

नाशिकरोड : चेहेडी गाव नदी किनारी, पंचक गोदावरी नदी स्वामी जर्नाधन पुलालगत, दसक गाव नदीतीरी, वालदेवी नदीतिरी, देवळाली गाव, विहीतगाव.

पंचवटी : राजमाता मंगल कार्यालय, म्हसरूळ सीतासरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझरतलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा.

नाशिक पश्चिम : यशवंतराव महाराज पटांगण, रोकाडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिध्देवर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट.

नवीन नाशिक : पिंपळगाव खांब, वालदेवी घाट.

विभागनिहाय कृत्रिम तलाव

नाशिक पूर्व : लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामी नगर लेन १ बसस्टॉपजवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेजवळ, राणेनगर, कलानगर चौक.