घरमहाराष्ट्रनाशिकलोकसभेपूर्वीच समृद्धीच्या भूमीपूजनाचा घाट

लोकसभेपूर्वीच समृद्धीच्या भूमीपूजनाचा घाट

Subscribe

मुंबई-नागपुर समृद्धी प्रकल्पासाठीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात केली होती. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहसचिव दिनेश वाघमारे यांनी जिल्ह्यातील प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यात सिन्नर तालुक्यातील शिवडेसह काही गावांत प्रलंबित असलेली भूसंपादनाची प्रक्रिया दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. 

लोकसभा निवडणुकीपुर्वी प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा डाव शासकीय पातळीवरून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. १० जिल्ह्यांतून जाणार्‍या या ७१२ किलोमीटरच्या महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी आणि सिन्नर तालुक्यात ४९ गावांतील १२८० हेक्टर जमीन संपादीत केली जाते आहे. सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र, शिवडे गावात अद्याप काही शेतकऱ्यांचा विरोध असल्याने ही प्रक्रिया प्रलंबित आहे. या एकूणच अडचणींबाबत सोमवारच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक विठ्ठल सोनवणे, इगतपुरीचे प्रांत राहुल पाटील, सिन्नरचे प्रांत महेश पाटील यांच्यासह प्रकल्पाशी निगडीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -