घरमहाराष्ट्रनाशिकशेतकर्‍यांना कर्ज न दिल्यास गुन्हे

शेतकर्‍यांना कर्ज न दिल्यास गुन्हे

Subscribe

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा : ६८८ कोटींचे वाटप

पीककर्जासाठी पात्र लाभार्थ्यांना कर्ज देण्यास बँकांनी टाळाटाळ केल्यास संबधित बँकेविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला. खरीप हंगामासाठी आतापर्यंत ६८८ कोटी रुपये कर्ज वितरीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँक अधिकार्‍यांची बैठक पार पडली. शेतकर्‍यांना बँकांकडून अडचण येऊ नये, तसेच बँकांना देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेण्यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात येते. दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडलेला असताना बँकांकडूनही कर्ज मिळत नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी कडक पावले उचलली आहेत. यापूर्वी जिल्हा बँकेकडूनही शेतकर्‍यांना कर्ज मिळत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने बँकेने कर्जवाटपाची तयारी दर्शवली. पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टांपैकी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या बँकाकडे अधिकची जबाबदारी आहे. त्यामुळे पात्र शेतकर्‍यांना कर्ज देण्यात यावे अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशाराच जिल्हाधिकार्‍यांनी दिला. यंदाच्यावर्षी ३१४३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ६८८ कोटी रुपये कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -