Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक एलआयसीचा राष्ट्रविकासात सिंहाचा वाटा

एलआयसीचा राष्ट्रविकासात सिंहाचा वाटा

Subscribe

महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन

एलआयसीमध्ये विमाधारकांनी केलेली गुंतवणूक सुरक्षित असते. त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वास संपादन करीत देशात प्रथम स्थान मिळवले आहे, सरकारी क्षेत्रातली ती एकमेव कंपनी आहे. त्यामुळे राष्ट्रविकासात या कंपनीने मोठे योगदान दिले आहे, असे महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांनी सांगितले.

स्वामी म्हणाले की, विमा क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या आल्या व बंद पडल्या, याचे एकमेव कारण म्हणजे एलआयसीने विमेदारांचा विश्वास संपादन केलेला आहे. स्पर्धेच्या काळात एलआसीने अस्तित्व अबाधित ठेवले आहे. आपल्या नवनवीन योजना अमलात आणून ग्राहकांना थेट फायदा मिळवून दिला आहे. समईच्या चार ज्योतिप्रमाणे संपर्क, समन्वय, सहवास आणि समाधान, लोकांशी संपर्क साधून चांगला समन्वय साधता येतो, त्यातून सहवास वाढतो आणि मग कार्यपूर्तीचे समाधान मिळते, असेही स्वामी म्हणाले.


- Advertisement -

हे देखील वाचा – शहरात पहिली हायटेक पोलीस चौकी कार्यान्वित


याप्रसंगी नाशिकचे वरिष्ठ विभागीय अधिकारी तुलसीदास गडपायले, विपणन अधिकारी एन. पी. गिरकर, प्रकाश दिडोलकर, पांडुरंग टोपले, व्यवस्थापक ग्राहकसेवा कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. पी. जी. जोशी यांनी आभार मानले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -