घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये साडेबारा लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिकमध्ये साडेबारा लाखांचा मद्यसाठा जप्त

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी करताना नाशिक जिल्ह्यातील चुंचाळेनगर, आगरटाकळी यांसह विविध ठिकाणे छापे टाकत टाकले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी करताना नाशिक जिल्ह्यातील चुंचाळेनगर, आगरटाकळी यांसह विविध ठिकाणे छापे टाकत टाकले. छाप्यांमध्ये १४७ गुन्ह्यांची नोंद केली असून, १२७ जणांना अटक केली आहे. कारवाईत रसायने, गावठी दारू, देशी दारू, विदेशी दारू, बिअर, ताडीसह चार दुचाकी, दोन तीनचाकी, दोन चारचाकी असा १२ लाख ४७ हजार ८६८ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक जिल्ह्यात मद्य तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निवडणूक प्रशासन, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संयुक्त सुरू आहे. गुरूवारी (दि. ४ ) रात्री आंतरराज्य सीमावर्ती भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत असताना स्कॉर्पिओ चालकाला अटक केली. किसन सुभाष चाफळकर (रा. चुंचाळेनगर) वाहनचालक असे अटक केलेल्याचे नाव आहे. दादरानगर हवेली या ठिकाणी असलेला मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने स्कॉर्पिओसह (एमएच ०५, जी-२२३५) जप्त केला. कारवाईत पथकाने विदेशी मद्यसाठा व वाहन असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी (दि. ३) वाल्मिक नगर, पंचवटी येथे अवैधरित्या देशी व विदेशी मद्यविक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सरताज रमेश रोकडे (रा. आगरटाकळी) याला अटक केली. त्याला रिक्षातून (एमएच १५, जे ५६५२) ५ प्लॅस्टिक ड्रममध्ये ११५ लिटर गावठी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना मुद्देमालासह पकडले. त्याच्या ताब्यातून ५१ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, हेमंत नेहरे, विलास कुवर, सुनील पाटील, विरेंद्र वाघ, विष्णू सानप, राजेंद्र चव्हाणके, पूनम भालेराव यांनी केली. दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४७ गुन्ह्यांची नोंद केली असून १२७ जणांना अटक केली आहे. आचारसंहिता १० मार्चला लागू झाल्यापासून उत्पादन शुल्क विभागाने १८ हजार ९१० लिटर रसायने, ८७२ लिटर देशी दारू, ६२ लिटर विदेशी दारू, १५९ लिटर बिअर, २१५ लिटर ताडी, परराज्यात विक्रीसाठी असलेले १२२ लिटर विदेशी मद्य जप्त केले.

कठोर कारवाई होणार

नाशिक जिल्ह्यातील मद्यविक्री परवानाधारकांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आचारसंहितेचे पालन करणार्‍या परवानाधारकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. – चरणसिंग राजपूत, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -