घरक्राइमगोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले जनावरांचे प्राण

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले जनावरांचे प्राण

Subscribe

लासलगाव : टाकळी विंचूर परिसरातील एसडीए स्कूल समोरील रस्त्यावरून सोमवारी (दि. १०) दुपारी साडे तीनच्या दरम्यान कत्तलीसाठी चार गोवंशाला आरोपी योगेश संजय थेटे, रमजान ऊर्फ फजल शरफोदीन शेख, दोघे रा. पालखेड मिरची पीकअप (एमएच 15-एचएच 8304) मधून घेऊन जात असल्याची माहिती लासलगाव व टाकळी परिसरातील गोरक्षकांना मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद जिल्हा सदस्य संतोष केंदळे यांनी बजरंग दल जिल्हा संयोजक समाधान कापसे यांना वरील प्रकार सांगितला असता कापसे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात माहिती कळवली. पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे है पोलीस कर्मचारी, गोरक्षक, बजरंग दलचे कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले व या पीकअप गाडीला अडवून गाडीतल्या जनावरांबाबत विचारपूस केली.या दोन्ही गुन्हेगारांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.या वेळी पिकप गाडीतील गोवंश अतिशय वाईट परिस्थितीत गाडीत बांधून कत्तलीसाठी जात असल्याचे आढळून आले.या घटनेतील गुन्हेगारांसह पीकअप गाडी व जनावरे पोलीसांनी ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -