लॉकडाउन वाढला ; नाशिक जिल्हयात अशी असेल नियमावली

कंटेनमेंट झोन वगळता व्यवहार सुरू राहणार ः मालेगांव तालुका पुर्णतः लॉकडाउन

solapur bandh
सोलापूरमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

राज्यात करोनाचा रूग्णांची वाढती संख्या बघता शासनाने लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवला आहे. त्यासंदर्भात केंद्र सोमवारी नियमावली जाहीर करण्यात येणार असली तरी , सध्या शासनाने दिलेल्या निर्देशानूसार नाशिक जिल्हयात ऑरेंज झोन वगळता रेड झोनमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या अधिकारानूसार नाशिकमध्ये रेड झोन मधील कंटेनमेंट झोन वगळता इतर व्यवहार मात्र पूर्वीप्रमाणे ९ ते ५ या वेळेतच सुरू ठेवता येतील. शासनाच्या निर्देशानूसार यात वेळोवेळी बदल करण्यात येतील अशी माहीती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगांवमध्ये मात्र अत्यावश्यक सेवा वगळता पुर्णतःलॉकडाउन राहणार आहे.

शासनाने आज यासंर्दभातला आदेश जारी केला. आपत्कालीन व्यवस्थान कायदा २००५ आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या लॉकडाऊनमध्ये कोविड १९ चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स आता ३१ मे पर्यंत लागू राहणार आहेत.तसेच त्या त्या जिल्हयांच्या परिस्थितीनूसार निर्णय घेण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. त्यानूसार नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भात आज आदेश काढत लॉकडाउन ३ मधील निर्बंध लॉकडाउन ४ मध्ये कायम ठेवले आहेत. नाशिक जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी जिल्हयातील १५ पैकी ५ तालुके हे ऑरेंज झोनमध्ये आहे. तर १० तालुके रेड झोनमध्ये आहेत. करोनासाठी मालेगांव तालुका हॉटस्पॉट ठरत आहे. जिल्हयातील सर्वाधिक रूग्ण हे मालेगांव तालुक्यात आढळून आले आहेत तसेच आसपासच्या ग्रामीण भागातही करोनाने शिरकाव केला आहे.शहरी भागात दाट लोकवस्तीत मात्र करोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले असले तरी, उपनगरांत मात्र करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रेड झोनमध्ये कंटेनमेंट झोन वगळता काही व्यवहार अटी, शर्थींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउन ३ च्या टप्प्यात उद्योगांना कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मालेगांव शहर हे पूर्णपणे रेड झोनमध्ये आहे त्यामुळे येथे मात्र जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार मात्र बंदच राहतील. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात ठेवता येणार आहेत. मात्र व्यवहार सुरू ठेवतांना सोशल डिस्टंसिंग ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, दुकानातील किंवा कार्यालयातील कर्मचारयांना स्वच्छतेसाठी सर्व साधने उपलब्ध करून देणे अनिवार्य राहणार आहे.

जिल्हयातील या सेवा बंदच राहणार
बससेवा, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा, सलून, स्पा, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, खेळ, संकुले, जलतरणतलाव, करमणूक उद्याने, बार, सभागृह, सर्वशाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था, आंतरजिल्हा व आंतरराज्यीय वाहतूक, जिल्हांतर्गत आणि जिल्हाबाहेर बस वाहतूक

जिल्हयात १८६ कंटेनमेंट झोन
जिल्हयात १८६ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. यात नाशिक शहरात २३, मालेगांव महापालिका क्षेत्रात ११९, मालेगांव ग्रामीण २, नांदगाव ३, येवला १२, चांदवड २, नाशिक ग्रामीण ६, निफाड ९, सिन्नर ५, दिंडोरी ३, कळवण १, बागलाण १ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये – जा होणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येउ शकणार नाही. या भागात जाणारया व्यक्तीला तपासणी केल्याशिवाय आत जाता येणार नाही.

हे तालुके रेड झोनमध्ये
नाशिक महापालिका व देवळाली कॅन्टोनमेंट क्षेत्र सहीत उर्वरित तालुका, मालेगाव महापालिका हदद व तालुका, निफाड, चांदवड, सिन्नर, येवला, नांदगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण

हे तालुके ऑरेंज झोनमध्ये
इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, देवळा

शासन निर्देशानूसार मुदतवाढ
अस्तित्वातील लॉकडाउन ३ ला शासनाने ३१ मे पर्यंत मुदतवाढ केली आहे कोणतेही नवीन वेगळ्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्या स्तरावर देखील अस्तित्वात असलेल्या लॉक डाऊनला मुदत वाढ देण्यात आली आहे. बाकी काही बदल नाहीत.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी