घरमहाराष्ट्रनाशिकप्रेमी युगुलाची कन्नमवार पूलावरुन गोदावरीत उडी

प्रेमी युगुलाची कन्नमवार पूलावरुन गोदावरीत उडी

Subscribe

पंचवटी ते द्वारका दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरील घटना

नाशिक दिवसांपासून संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलावरून रविवारी (ता.७) रात्री ८ वाजेच्या सुमारास एका प्रेमयुगुलाने उडी गोदावरी नदीपात्रात उडी मारल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मुलीला नदीपात्रातून बाहेर काढत जीव वाचवण्यात यश मिळवले. नदीपात्रात उडी मारलेल्या मुलाचा शोध सुरू आहे. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. प्रेम उर्फ आदिनाथ विजय शिंदे (रा. नांदुरनाका) असे मुलाचे नाव आहे. पंचवटी अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -