घरताज्या घडामोडीकेटरींग असोसिएशनतर्फे पोलिसांना जेवणाचे पाकिटे

केटरींग असोसिएशनतर्फे पोलिसांना जेवणाचे पाकिटे

Subscribe

सामाजिक बांधिलकी जोपासली; फोटो न काढताच केले समाजकार्य

नाशिक : करोना योध्दे म्हणून आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून केटरिंग असोसिएशन नाशिकतर्फे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जेवणाचे पाकिटे पुरवली जात आहेत. दिवसाला 300 ते 350 पाकिटे वाटप करुन केटरिंग असोसिएशनने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. शहरातील जोपडा लॉन्स, आकाशवाणी टॉवर, कॉलेज रोड, नवश्या गणपती, गंगापूर गाव, शिवाजी नगर, कारबन नाका, अशोक नगर, पिंपळगाव बहुला, सातपूर, मायको सर्कल, पाथर्डी फाटा, द्वारका, सारडा सर्कल, त्र्यंबक नाका, स्विमिंग पूल या भागात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना ही सेवा पुरवली जात आहे. तसेच अटल बिहारी शाळा (काठे गल्ली), आनंदवल्ली शाळा येथे दररोज 300 – 350 जेवणाचे पॅकेट वाटप केले जाते. विशेष म्हणजे अन्नदान करताना कोणत्याही प्रकारचा फोटो काढत नाहीत. सामाजिक जाणिवेतून हे सर्व केले जात असल्याने त्याचा फोटो काढुन प्रसिध्द करण्याचा हेतू ठेवलेला नाही. नाशिक शहरातील प्रत्येक केटरर्सचा यात मोलाचा वाटा राहिला आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -