घरमहाराष्ट्रनाशिकमहापौर गेले पाथर्डीकरांच्या दारी; फुंकली समस्यामुक्तीची तुतारी

महापौर गेले पाथर्डीकरांच्या दारी; फुंकली समस्यामुक्तीची तुतारी

Subscribe

प्रभाग क्रमांक ३१ मधील आरक्षीत जागेत दवाखाना बांधण्यात येईल. तसेच अंत्यविधीसाठी स्वतंत्र शेड देखील बांधण्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. ‘महापौर तुमच्या दारी’ उपक्रमाचे उदघाटन दोंदे नगर येथील सामाजिक सभागृहात झाले. यावेळी प्रभाग क्रमांक ३१ च्या नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रभागातील सर्वच समस्यांपासून मुक्ती देण्याची ग्वाही यावेळी महापौरांनी दिली.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रभाग ३१ साठी दवाखाना आवश्यक असून त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा. तसेच अंत्यविधीसाठी तातडीने शेड बांधण्यात यावे. यावेळी ग्रामीण भागासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करणे गरजेचे आहे. ज्या भागात सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न आहे या भागात शौचालय बांधण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी. नांदूर दाढेगाव शिव रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. शहर विकासाच्या बाबतीत महापालिका आयुक्तही सकारात्मक असून आपण मांडलेल्या विषयांना लवकरच गती मिळेल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात आ.सीमा हिरे यांनी बोलताना सांगितले की नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा पडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पालिका नागरी सुविधा देण्याचे काम करत आहे त्यात आपण देखील त्यांना साथ दिली पाहिजे. प्रभागाची व्याप्ती मोठी असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली जात असते या परिसरातील पाणी प्रश्नासाठी निधी उपलब्ध करून देऊन पाण्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले. कार्यक्रमात प्रभागाचे नगरसेवक भगवान दोंदे, सुदाम डेमसे व साहेबराव आव्हाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील रहिवाशी दत्तू जाधव, हरक, चव्हाण, त्रंबक कोंबडे, गणेश कंकाळे, शामराव लोखंडे, योगेश धोंडे, कांबळे तसेच महिला शिष्टमंडळाने मांडले. या कार्यक्रमास नगरसेवक चंद्रकांत खोडे, गिरीश पालवे, अहमद काजी, त्र्यंबक ठोंबरे, उत्तम दोंदे, सुधीर दोंदे, निवृत्ती गवळी, त्र्यंबक ठोंबरे, वामन जाचक, विलास दोंदे, शामराव लोखंडे आदींसह आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने, वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन रावते, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर,अभियंता राजू आहेर, रौंदळ,देविदास पगारे, बागुल आदी उपस्थित होते. गौतम दोंदे यांनी सूत्रसंचालन केले.

नागरिकांनी मांडल्या सूचना

  • परिसरासाठी रुग्णालय असावे
  • दाढेगाव, पिंपळगाव, गौळणे  रस्ता करावा, दाढेगाव  येथे पूल करावा
  • ग्रामीण भागाचा विचार करुन प्रभागासाठी भरीव निधी द्यावा
  • पिंपळगाव पाथर्डी रोड तातडीने बांधावा
  • सुखदेव नगर परिसरातील रस्ते करावे
  • मळे परिसरातील रस्ते दुर्लक्षित झाले असून त्यांना प्राधान्य द्यावे
  • पिंपळगाव पाथर्डी शिव रस्ता करावा
  • परिसरासाठी  दशक्रिया विधी शेड करावे
  • मधुकरनगर  परिसरात रस्ते करून रहिवाशांची घरपट्टी लावून घ्यावी
  • खडीकरण झालेले रस्ते डांबरीकरण करण्यात यावे
  • पाथर्डी येथील सभागृह नव्याने बांधण्यात यावे
  • गावकीच्या जागेत  वाचनालय किंवा विरंगुळा केंद्र सुरू करावे
  • रस्ते विकसित करताना त्याला दुभाजक असावेत
  • काही भागातील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था असून त्या ठिकाणी स्वच्छता व्हावी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -