घरमहाराष्ट्रनाशिकदेशातील मका उत्पादनात ५० लाख टनांनी घट; दुष्काळाचा मका शेतीला फटका

देशातील मका उत्पादनात ५० लाख टनांनी घट; दुष्काळाचा मका शेतीला फटका

Subscribe

देशातील मका उत्पादक राज्यातील उत्पादन तब्बल २० टक्क्यांनी घटले आहे. देशातील बहुतांश राज्यात यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. त्याचा मोठा फटका मक्याला बसला असल्याने येत्या काळात मक्याचे दर चढेच राहतील असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

काही वर्षांपासून पोल्ट्रीसह इतर प्रक्रिया उद्योगांसाठी मक्याची मागणी वाढत आहे. या स्थितीत यंदा देशातील मका उत्पादक राज्यातील उत्पादन तब्बल २० टक्क्यांनी घटले आहे. देशातील बहुतांश राज्यात यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. त्याचा मोठा फटका मक्याला बसला असल्याने येत्या काळात मक्याचे दर चढेच राहतील असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

पोल्ट्री खाद्यात मका उत्पादनाची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे संघटीत असलेल्या पोल्ट्री क्षेत्राकडून मक्याची मोठ्या प्रमाणावर मागणी होते. त्या शिवाय विविध प्रक्रिया उत्पादनांसाठी मक्याला नेहमीच मागणी असते. जागतिक आणि देशाच्या पातळीवरही यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र आहे. या स्थितीत मक्याच्या उत्पादनात घट झाली आहे. देशातील कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात प्रामुख्याने मक्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा दुष्काळामुळे बहुतांश भागातील शेतकर्‍यांनी मक्याच्या पेरणीपासून हात आखडता घेतला आहे.

- Advertisement -

मका उत्पादनात नाशिक पुढे

राज्यात नाशिक जिल्हा हा मका उत्पादनात राज्यात सर्वात पुढे आहे. नाशिक जिल्ह्यातील वाढलेला पोल्ट्री उद्योग हे त्याचे महत्वाचे कारण आहे. नाशिकमधील ए.व्ही. ब्रॉयलर्स, आनंद हॅचरिज या पोल्ट्रीतील आघाडीच्या कंपन्यांनी देशात नाशिकचे नाव नेले आहे. दुष्काळी तालुक्यातील हजारो शेतकरी करारशेतीच्याद्वारे या कंपन्यांशी जोडले आहेत.

रब्बीची पेरणी १०८ टक्के

नाशिक जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात रब्बीची पेरणी १०८ टक्के झाली आहे. नाशिकच्या सिन्नर (१८०टक्के), मालेगाव (१३५), कळवण (१२७), दिंडोरी (१४३), नांदगाव (६३), नाशिक (५४) हे तालुके आघाडीवर आहेत. दुष्काळी स्थितीत रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी झालेले मका हे एकमेव पिक आहे. मक्याच्या दरात तेजीची स्थिती राहणार असल्याने त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होणार आहे.

- Advertisement -

दर येत्या काळातही टिकून राहतील

दुष्काळी भागातील सर्वसामान्य शेतकर्‍यांचे अर्थकारण चालवण्यास मका पिकाने मोठा आधार दिला आहे. यंदा उत्पादनात २० टक्क्यांनी घट झाल्याने त्याचा मक्याचे दर क्विंटलला पाचशे रुपयांनी वाढले आहेत. जगभरातील मागणीची स्थिती पाहता हे दर येत्या काळातही टिकून राहतील. – दीपक चव्हाण, शेतमाल बाजार अभ्यासक, पुणे.

देशातील मक्याचे उत्पादन

खरीप : १८० लाख टन
रब्बी : ७० लाख टन
एकूण : २५० लाख टन

मका उत्पादनातील आघाडीवरील राज्ये, उत्पादन (टककेवारी)

  • कर्नाटक – १४.९९
  • मध्यप्रदेश – ११.८३
  • बिहार – ११
  • तामिळनाडू – १०.९१
  • तेलंगणा – ७.९८
  • महाराष्ट्र – ६.९२
  • आंध्रप्रदेश – ६.४६
  • उत्तरप्रदेश – ५.४७
  • राजस्थान – ५.५५
  • इतर – ३.७१
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -