घरताज्या घडामोडीनाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात भीषण आग

नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात भीषण आग

Subscribe

नाशिक शहरातील नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातील भाटिया बॅग्ज दुकानाशेजारील गाळ्याच्या वरच्या भागाला सोमवारी (दि.१८) रात्री ८ वाजेदरम्यान भीषण आग लागली. आगीचे लोळ दिसल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास मिळताच घटनास्थळी दोन बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -

नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील मलन टायर दुकानाशेजारी गाळ्याच्या वरच्या भागाला आग लागली. आगीचे लोळ दिसू लागल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाचे बंब व जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -