घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये पेपर मिलला भीषण आग; जिवीतहानी नाही

नाशिकमध्ये पेपर मिलला भीषण आग; जिवीतहानी नाही

Subscribe

दिंडोरी तालुक्यातील घटना, अग्निशमन दलाच्या बंबांनी काही वेळातच आटोक्यात

दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथील बाणगंगा पेपर मिल येथे मंगळवारी (२६ मार्च) सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत सुमारे अडीच कोटी रूपयांचे नुकसान झाले.आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

आगीची माहिती समजताच प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक पुंडलिक खोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधत पेपर मिलला आग लागल्याची माहिती दिली. आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -